

भारतीय रेल्वेत प्रवासी कधी काय पराक्रम करतील याचा काहीच नेम नाही. एका पंडिताने थेट एसी लोकलमध्ये पूजा थाटल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. अनेक प्रवाी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न देखील करत आहेत पण हा माणूस कोणाचेही न ऐकता पूजा करतच आहे. यामुळे इतर प्रवासी काही काळ घाबरलेल्या स्थितीत होते.
सध्या भारतीय रेल्वेतील अनेक प्रसंग सोशल मीडियावर झटक्यात व्हायरल होताना दिसतात . काही दिवसांपूर्वी दिल्लीहून मुंबईला येणाऱ्या पश्चिम एक्स्प्रेसमधील व्हिडिओ व्हायरल झाला होता. एका कुटंबाने या एक्स्प्रेसमध्ये भव्य पूजा मांडली होती. यावरून सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. आज असाच आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एका पंडिताने धावत्या ट्रेनमध्ये चक्क दिवा आणि अगरबत्ती पेटवली आहे.
पहाट होताच ट्रेनमध्ये बसलेल्या एका प्रवाशाने देवाची पूजा करण्यासाठी दिवा आणि अगरबत्ती पेटवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा प्रवासी ३AC कोचच्या अप्पर बर्थवर बसून देवाची पूजा करत होता. इतर प्रवाशांनी त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न देखील केला. या व्हिडिओत स्पष्टपणे दिसत आहे की, अनेक प्रवासी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. एक प्रवासी जोरात ओरडून सांगतोय की "आता फायर अलार्म वाजेल मग काय कराल?", तर दुसरा बोलतोय "अरे पंडितजी चालत्या ट्रेनमध्ये तुम्ही हे काय करत आहात? यामुळे ट्रेनमध्ये आग लागू शकते."
संबंधीत ट्रेनचे नाव कळू शकले नसले तरीही व्हायरल होणाऱ्या व्हिडिओवरून ती एसी, स्लीपर ट्रेन आहे. भारतीय रेल्वे नियमानुसार ट्रेनमध्ये ज्वलनशीर पदार्थ म्हणजेच माचिस, लाईटर, मेणबत्ती इ.नेण्यास सक्त मनाई आहे. ट्रेनमध्ये पेट घेणाऱ्या अनेक गोष्टी असतात म्हणून छोट्याश्या निष्काळजीपणामुळे मोठा अपघात घडू शकतो. त्यामुळे पूजा करणे हा आस्थेचा विषय असला तरी सुरक्षा सगळ्यात महत्त्वाची आहे. अश्या प्रकारच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.