सचिन बनसोडे, साम टीव्ही
शिर्डी: स्वतःला साक्षात देवाचा अवतार आणि स्वघोषित ज्योतिषी म्हणवून घेत भाविकांची फसवणूक आणि महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. समता पतसंस्थेत बनावट खाती उघडून कोट्यवधी रुपयांचे संशयास्पद व्यवहार केल्याप्रकरणी राहाता न्यायलयाने अशोक खरातला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
अवघ्या राज्यात भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली होती. महिलांना आपल्या कार्यालयात बोलावून त्यांच्या अडचणीचा गैरफायदा घेत त्यांचे शोषण केल्या प्रकरणी भोंदूबाबाची जेलवारी सुरू आहे. सध्या नाशिकच्या विविध पोलीस ठाण्यात त्याच्यावर दहापेक्षा अधिक महिलांनी अत्याचार केल्याचे गुन्हे दाखल आहे. याप्रकरणी राज्य सरकारने SIT देखील स्थापन केली होती. यानंतर त्याची नाशिकच्या जेलमध्ये रवानगी करण्यात आली होती. मात्र हे प्रकरण सुरू असतानाच ज्यांची आर्थिक फसवणूक झाली आहे ते देखील मोठ्या हिमतीने पुढे आले. या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी दोन दिवसांपूर्वी अशोक खरातला शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान भोंदू अशोक खरात याचया आर्थिक गैरव्यवहाराची धक्कादायक माहिती समोर आली आहे. खरातने आपल्या अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकलेल्या 57 हून अधिक भाविकांच्या आणि भक्तांच्या कागदपत्रांचा गैरवापर करून समता पतसंस्थेत सुमारे 100 हून अधिक बनावट खाती उघडली होती.
या बनावट खात्यांच्या माध्यमातून त्याने तब्बल 60 कोटींहून अधिक रुपयांचे संशयास्पद आर्थक व्यवहार केल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे. भक्तांच्या नकळत त्यांच्या नावावर उघडण्यात आलेल्या या खात्यांचा वापर नेमक्या कोणत्या बेकायदेशीर कामांसाठी आणि काळ्या पैशाच्या हेरफेरीसाठी झाला, याचा तपास आता पोलीस करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.