संजय जाधव
बुलढाणा : यंदा पावसाच्या लहरीपणामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे उत्पादनात घाट झाली आहे. या शिवाय कापूस व सोयाबीनला देखील अपेक्षित भाव नाही. या विरोधात रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी एल्गार रथयात्रा काढली आहे. यात शेतकरी देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले असून या रथयात्रेदरम्यान संतप्त (Buldhana) शेतकऱ्यांनी सोयाबीन व कापूस जाळत सरकारचा निःशेष केला आहे. (Tajya Batmya)
सोयाबीन- कापसाचा उत्पादन खर्च प्रचंड वाढला आहे. त्या तुलनेत बाजारात मिळणार भाव अत्यल्प आहे. त्यात भरचभर येलो मोझँक, बोंडअळी व पावसात खंड पडल्याने सोयाबीन- कापसाचे प्रचंड नुकसान झाले आहे. उत्पादनात प्रचंड घट आली आहे. काढणी खर्चही परवडत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी (farmer) उभ्या पिकात शेळ्या-मेंढ्या घुसविल्या आहेत. सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे. अशा परिस्थितीत सरकार मात्र झोपेचे सोंग घेवून बसले आहे. निद्रिस्त सरकारला जागे करण्यासाठी आज खामगाव तालुक्यातील संतप्त शेतकऱ्यांना सोयाबीन-कापूस जाळून सरकारचा निषेध केला.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
सरकारने जर तातडीने सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडे लक्ष दिले नाही; तर येणाऱ्या काळात एवढे तीव्र आंदोलन उभे करू की सरकारच्या पायाखालची वाळू सरकेल. असा इशारा रविकांत तुपकरांनी दिला आहे. त्यामुळे यावर्षीचे सोयाबीन- कापूस आंदोलन निश्चित पेटण्याची चिन्हे आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.