Nandurbar News
Nandurbar NewsSaam tv

Nandurbar News : ऐन दिवाळीत शेतकऱ्यांवर उपोषणाची वेळ; साखर कारखान्याने ऊसाचे पैसे थकविले

Nandurbar News : कारखाना चालकांकडून शेतकऱ्यांना वारंवार आश्वासन देऊनही शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे दिले जात नसल्याने शेतकरी आणि नर्मदा बचाव आंदोलन यांच्याकडून साखळी उपोषण
Published on

सागर निकवाडे 
नंदूरबार
: प्रकाशपर्व असलेल्या दिवाळी सणाची सर्वत्र तयारी सुरु आहे. बाजारातून खरेदी केली जात आहे. मात्र ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर (Farmer) शेतकऱ्यांवर उपोषणाची वेळ आली आहे. साखर कारखान्याने (Sugar Factory) ऊस खरेदी केल्यानंतर त्याची रक्कम अद्याप शेतकऱ्यांना दिलेली नाही. यामुळे शेतकरी उपोषणाला बसले आहेत.  (Maharashtra News)

Nandurbar News
Manoj Jarange Patil : जात संपू देऊ नका, मनोज जरांगे पाटलांचं मराठा नेत्यांना आवाहन

शहादा तालुक्यातील नागाई देवी शुगर लिमिटेड या साखर कारखान्याकडे १३०० शेतकऱ्यांचे ३५ कोटी रुपये उसाचे घेणे बाकी आहे. मात्र संबंधित कारखाना चालकांकडून शेतकऱ्यांना वारंवार आश्वासन (Nandurbar) देऊनही शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे दिले जात नसल्याने शेतकरी आणि नर्मदा बचाव आंदोलन यांच्याकडून साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Nandurbar News
Parbhani Crime News: महिलेचे हातपाय बांधून चोरीचा प्रयत्न; मानवत शहरातील घटना

नागाई देवी साखर कारखान्याला शेतकऱ्यांसोबतच कामगार वाहतूक करणारे अशा अनेक लोकांचं पैसे थकीत झाले आहेत. मात्र प्रशासन देखील या गोष्टीत गांभीर्याने लक्ष देत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठ संकट आलं आहे. शेतकऱ्यांना उसाचे पैसे अध्यापित मिळालेला नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या दसरा, दिवाळी देखील अंधारात जाणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे कारखानदाराने शेतकऱ्यांचे पैसे लवकर दिले नाही; तर आणखीन तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा नर्मदा बचाव आंदोलनांकडून देण्यात आलेला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com