Gondia : तब्बल १५ वर्षानंतर अर्जुनी मोरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत धान खरेदीस प्रारंभ

arjuni morgaon krushi utpanna bazar samiti : यापूर्वी शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल मागे चारशे ते पाचशे रुपये दराने तोटा सहन करावा लागत हाेता.
gondia, arjuni morgaon krushi utpanna bazar samiti
gondia, arjuni morgaon krushi utpanna bazar samitisaam tv
Published On

- शुभम देशमुख

Gondia News : गोंदिया जिल्हा हा धानाचा कोठार म्हणून ओळख आहे. त्यातच अर्जुनी मोरगाव तालुका हा भात पिकाच्या उत्पादनात अव्वल असतो. शेतकऱ्यांचा धान कापणी व मळणीला आला असतानाही जिल्ह्यात धान खरेदी केंद्र सुरू झाले नाहीत. त्यामुळे नाईलाजाने शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांच्या दारात जाण्याची वेळ आली आहे. ही बाब ओळखून बाजार समिती अर्जुनी मोरच्या संचालक मंडळांनी सुमारे पंधरा वर्षापासून बंद पडलेली धान खरेदी नुकतीच सुरु केली आहे. (Maharashtra News)

gondia, arjuni morgaon krushi utpanna bazar samiti
Shanti Mahotsav Buldhana 2023 : शांती महोत्सव विसर्जन मिरवणुकीत युवकाचा मृत्यू

सर्वाधिक धान लागवड असलेल्या आणि धाणाचे कोठार म्हणून ओळखले जाणाऱ्या या भागात शेतकऱ्यांची होत असलेली आर्थिक कोटी ही नित्याचीच झाली आहे. परिणामी दिवाळीत शेतकऱ्यांची (farmers) होणारी आर्थिक कोंडी दूर करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती अर्जुनमोरच्या वतीने धान खरेदी सुरू करण्यात आली आहे.

शेतकरी हलक्या धानाच्या विक्रीतून दिवाळी साजरी करतो. पण जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने मुदतीच्या दोन महिन्यानंतरही आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू केले नाही. ही नामी संधी साधून व्यापाऱ्यांनी हमी भावापेक्षा ४०० ते ५०० रुपये प्रतिक्विंटल कमी दराने व्यापा-यांनी धान खरेदी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

तालुक्यात आदिवासी विकास महामंडळाचे सहा आणि मार्केटिंग फेडरेशनचे १२ असे एकूण १८ धान खरेदी केंद्र आहेत. पण अद्यापही आधारभूत खरेदी केंद्र सुरू झाले नाही. सरकारने धानासाठी २१८३ रुपये हमीभाव निर्धारित केला. पण दिवाळीच्या तोंडावर खरेदी सुरू न झाल्यामुळे काही व्यापाऱ्यांनी गावागावात जाऊन भाव पाडले आहेत.

gondia, arjuni morgaon krushi utpanna bazar samiti
Kalicharan Maharaj : धाराशिव लोकसभा निवडणूक लढवणार ? राजकारणातील प्रवेशाबाबत कालीचरण महाराज स्पष्टच बाेलले

त्यामुळे शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल मागे चारशे ते पाचशे रुपये दराने तोटा सहन करावा लागत आहे. या सर्व विवंचनेतून आता शेतकरी वाचणार आहे. शेतकऱ्याला वाहतुकीचा खर्च बसतो त्यासोबतच हमालीच्या नावाने खरेदी केंद्रांमध्ये भुर्दंड द्याव लागत आहे. आता त्या उलट बाजार समितीच्या सेस फंडातून शेतकऱ्यांच्या गावाच्या अंतरावर आधारित हमाली आणि वाहतूक भाडे प्रति क्विंटल प्रमाणे शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.

काही व्यापारी शेतकऱ्यांकडून धान घेऊन चुकाऱ्यासाठी ताडकळत करतात व ठेवायचे ही समस्या दूर करून शेतकऱ्यांच्या मालाला चुकारा हा पाच दिवसाच्या आत अदा केला जाईल याची हमी कृष उत्पन्न बाजार समितीची असणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती अर्जुनी मोरगावच्या यार्डात आपले धान विक्री करण्याचे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व संचालक यांनी केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

gondia, arjuni morgaon krushi utpanna bazar samiti
Nitesh Rane On Grampanchayat Election Results : काेकणात भाजपच, अजित पवारांच्या करिष्म्यावर नितेश राणेंकडून काैतुक (पाहा व्हिडिओ)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com