बीड : बीड जिल्ह्यात पाऊस लांबल्याने पीककर्ज मागणीचे प्रमाण घटली होती. मात्र मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या (Farmer) आशा पल्लवित झाल्या आहेत. यामुळे पीक कर्जाची मागणी वाढत आहे. गेल्या ३ महिन्यात (Beed) जिल्ह्यातील १ लाख ११ हजार १५८ शेतकऱ्यांना ८५३ कोटी ४८ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. कर्ज वाटपाचे हे प्रमाण दिलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत ५२ टक्के इतके असून पुढील ३ महिन्यात ४८ टक्के पीककर्ज वाटपाचे आव्हान बँकांपुढे आहे. (Latest Marathi News)
बीड जिल्ह्यात २०२३- २४ च्या खरीप हंगामासाठी राष्ट्रीयकृत, व्यावसायिक, ग्रामीण आणि जिल्हा बँकांना एकूण १ हजार ६४० कोटी रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार एप्रिलपासून पीककर्ज मागणी शेतकऱ्यांकडून होत होती. एप्रिल आणि मे मध्ये आलेल्या प्रस्तावांची छाननी करून पात्र प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे.
जूनमध्ये सुरुवातीपासून पाऊस नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली. शेतीसाठी पीककर्ज घ्यावे की नाही? या विवंचनेत शेतकरी होते. पाऊस लांबल्यामुळे होणाऱ्या मागणीत घट झाली. मात्र काही बँका वगळता इतर सर्व बँकांनी तत्परतेने पीककर्ज वाटपास सुरुवात केलीय. ३० जूनपर्यंत ८५३ कोटी ४८ लाख रुपयांचे पीककर्ज (Crop Loan) वाटप करण्यात आले असून, हे प्रमाण ५२ टक्के असल्याचे जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजेंदू झा म्हणाले आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.