Jalgaon News: अत्यल्प पावसामुळे खरिपाच्या पेरण्या केवळ १५ टक्के

अत्यल्प पावसामुळे खरिपाच्या पेरण्या केवळ १५ टक्के
Jalgaon News Kharif Hangam
Jalgaon News Kharif HangamSaam tv
Published On

जळगाव : मुंबई, पुणे येथे चांगला पाऊस पडत आहे. परंतु, जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ९२.४ मिलिमीटर पाऊस (Rain) झाला आहे. जून महिना उलटून जुलै सुरू झाला, तरी अद्यापपर्यंत पेरण्यायोग्य पाऊस झालेला नाही. तरी देखील काही शेतकऱ्यांनी (Farmer) खरिपाच्या पेरण्या सुरू केल्या आहेत. आतापर्यंत केवळ १५ टक्के पेरण्या झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली. (Maharashtra News)

Jalgaon News Kharif Hangam
Latur Accident News: महाविद्यालयात प्रवेश घेऊन परतताना अपघात; बहिण भावाचा जागीच मृत्यू

जून महिन्याचे २६ दिवस पावसाअभावी कोरडे गेले. नंतर थोडाफार पाऊस झाला. मात्र, दमदार पावसाची अद्याप प्रतिक्षा आहे. बागायतदार शेतकऱ्यांनी कापसाच्या पेरण्या केल्या. मात्र, कोरडवाहू शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. आता पाऊस येईल, या आशेवर कोरडवाहू शेतकऱ्यांनीही पेरण्यांना सुरवात केली आहे.

Jalgaon News Kharif Hangam
Thane News: साहेब आतातरी एकत्र या..ठाण्यात शिवसेना ठाकरे आणि मनसे कार्यकर्त्यांचा एकत्रित बॅनर

१५ जुलैपर्यंत पेरण्या करता येतील

उडीद, मूग वगळता कापूस, मका, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, तूर या पिकांच्या पेरणया १५ जुलैपर्यंत करता येतील. आता मात्र पावसाने वेग घेतला पाहिजे. किमान आगामी आठ दिवसांत दमदार पाऊस झाल्यास रखडलेल्या पेरण्या पूर्ण होतील, अशा आशावाद शेतकरी व्यक्त करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com