Manoj Jarange Patil Vs Chhagan Bhujbal
Manoj Jarange Patil Vs Chhagan BhujbalSaam Tv

Chhagan Bhujbal News: ओबीसींची मते तुम्हाला नकोय का? भुजबळांचा थेट सत्ताधाऱ्यांना सवाल

Chhagan Bhujbal On OBC Reservation: ओबीसींची मते तुम्हाला नकोय का? भुजबळांचा थेट सत्ताधाऱ्यांना सवाल
Published on

Chhagan Bhujbal On OBC Reservation:

''मराठा आरक्षणाला मी आणि माझ्या पक्षाने किंवा समता परिषद कधीही विरोध केला नाही. आम्ही नक्की हे म्हणालो की, कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावताना मराठा समाजाला आरक्षण द्या'', असं अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ म्हणाले आहेत. माध्यमांशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत. सरसकट आरक्षण देणं हे बेकायदेशी आहे, असंही ते म्हणाले आहेत.

छगन भुजबळ म्हणाले आहेत की, ''मी आज बीड आणि माजलगाव येथे घरे, ऑफिस हॉटेल्स जाळपोळ नासधूस केली, त्याची पाहणी करण्यासाठी गेलो होतो. आज अचानक नासधूस करण्यात आली. समता परिषदेचे हॉटेल्सचं मोठं नुकसान झालंय. तासभर 400-500 जणांचा जमवाव नासधूस करत होते. त्यात पहारी, कुऱ्हाडी घेऊन आले होते. अक्षरशः त्या हॉटेल्सची राखरांगोळी करण्यात आली.'' ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Manoj Jarange Patil Vs Chhagan Bhujbal
Gram Panchayat Result: ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, उद्धव ठाकरेंना टोला

ते म्हणाले, अमर संदीप क्षीरसागर यांचे घर का जाळले? त्यांनी तर काहीही म्हणाले नाही. या सगळ्या जाळपोळीची कठोर चौकशी करायला हवी. पोलीस हतबल झाले आहेत. (Latest Marathi News)

भुजबळ पुढे म्हणाले, ''अंतरवाली इथं जरांगे ज्यावेळी उपोषणाला बसले होते, त्यावेळी पोलीसही जखमी झाले. पोलिसांची बाजू पुढे आली नाही. त्यांच्यावर हल्ला झाला होता. त्यावर सरकारने काही अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या, कारवाई केली, गुन्हे मागे घ्याययला लावले.''

Manoj Jarange Patil Vs Chhagan Bhujbal
Pimpari Chinchwad Crime: स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू होता भलताच प्रकार; पोलिसांना माहिती मिळाली अन्....

'तुम्हाला ओबीसींचे मतं नकोय का?'

भुजबळ म्हणाले, ''त्या हल्ल्यावेळ पोलीस जखमी झाले, त्याचीही चौकशी केली पाहिजे. मंत्री, न्यायमूर्ती जात आहेत. हात जोडत आहेत. मग ओबीसींना काय न्याय मिळेल, ते तिकडे जाऊन हात जोडत आहेत.'' तुम्हाला ओबीसींचे मतं नकोय का? असा सवाल भुजबळ यांनी सत्ताधारी पक्षांना केला आहे.

ते म्हणाले, ''कुणबी तपासणीत 5 हजार पुरावे मिळाले. नंतर अचानक 10 हजार झाले, त्यानंतर 13 हजार झाले. आता तर साऱ्या महाराष्ट्रात ऑफिस उघडले. सरसकट कुणबी आरक्षण देण्यास आमचा विरोध आहे. जे तिथं जाऊन पाया पडत आहेत, त्यांच्याकडून काय अपेक्षा करायच्या?''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com