Jambul, Indapur, Amar Baral, Amazon saam tv
ऍग्रो वन

Success Story: खडकाळ जमिनीवर जांभळाची शेती बहरली; ॲमेझॉनवर मिळताेय किलाेला 200 रुपयांपासून 280 चा भाव

काही प्रमाणात जांभूळ हे पुणे, सोलापूर आणि मुंबई बाजारपेठेत विक्रीस जातात.

मंगेश कचरे

Indapur News : शेतमालाला चांगला भाव मिळावा यासाठी शेतकरी विविध प्रयत्न करतो. असाच एक प्रयत्न इंदापूर येथील शेतकऱ्यांनी केला. त्यांच्या शेतात पिकवलेली जांभळाची विक्री आता थेट ॲमेझॉन (jambul on amazon) वरून होत आहे. (Maharashtra News)

इंदापूर तालुक्यातील कचरवाडी येथील अमर बरळ (amar baral) यांची शेती ही खडकाळ जमिनीवर आहे. पूर्वी ते डाळिंबाचे उत्पादन घेत होते मात्र काही वर्षांपूर्वी गारपीटीमध्ये अनेक बागा जमीनदोस्त झाल्या. त्यात बरळ यांची ही बाग जमीनदोस्त झाली होती. त्यातून सावरून त्यांनी कोकण (kokan) येथे शेतकरी सहल गेली असता तिथून प्रेरणा घेऊन अडीच एकर जांभळाची बाग लावली.

जांभूळ हे जंगली पिक असल्याने खडकाळ जमिनीवर जांभळाची शेती बहरली आणि जंगली पिक असल्याने यावर रोगराई ही कमी प्रमाणात असल्याने फार कमी प्रमाणात त्यांना औषध फवारणी करावी लागत आहे. पाच वर्षानंतर जांभळाच्या प्रत्यक्ष उत्पादनाला सुरुवात झाली. सुरुवातीला त्यांनी पुणे मुंबई आणि सोलापूर या ठिकाणी जांभूळ विक्री केली. त्यातून त्यांना बऱ्यापैकी उत्पादनही मिळाले.

सध्या सोशल मीडियाचा (social media) वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून याचाच फायदा घेत अमर बरळ यांनी ॲमेझॉन सारख्या मोठ्या कंपनीबरोबर करार करून ॲमेझॉनच्या मार्फत जांभळाची विक्री करण्यास सुरुवात केली.

ॲमेझॉनवर त्यांना किलोला 200 ते 280 इतका दर मिळू लागला आहे. त्याचबरोबर ठीक ठिकाणी झालेल्या मॉलमध्ये देखील त्यांचे जांभळ विक्रीला जात आहे. त्याचबरोबर काही प्रमाणात जांभूळ हे पुणे, सोलापूर आणि मुंबई या बाजारपेठेमध्ये देखील जात आहे असे अमर बरळ यांनी साम टीव्हीशी बाेलताना सांगितले.

बरळ यांचे कुटुंब जांभळाची तोडणी घरच्या घरीच करीत असून तोडणी करून मालाची निवड करून जांभळ पॅकिंग मध्ये भरून ते सध्या टेंभुर्णी येथील ॲमेझॉनच्या सेंटरवर (tembhurni amazon center) जांभूळ विक्रीसाठी पाठवत आहेत.

किरकोळ बाजारपेठेमध्ये जांभळाला सध्या 70 रुपयांपासून ते 150 रुपये असा किलोला दर मिळत आहे. मात्र ॲमेझॉन वर जांभळाला किलोला 200 ते 280 असा दर मिळत असल्याने बरळ यांना सध्या चांगला नफा हा जांभळ विक्रीतून मिळत आहे. त्यामुळे त्यांच्या उत्पादनात वाढ झाली आहे.

सध्याच्या काळात शेतमालाची विक्री होत असताना व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची (farmers) लूट होते असे चित्र आहे मात्र सोशल मीडियाचा योग्य वापर करून जर शेतमालाची विक्री केली तर मोठ्या प्रमाणात उत्पादन देखील मिळवता येते हे अमर बरळ यांनी दाखवून दिले आहे

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT