'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

Ladki Bahin Yojana: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठं विधान केलंय. मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचे दावे फेटाळून लावत राज्यातील महिलांना योजनेबाबत आश्वस्त केलंय. जोपर्यत देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत योजना सुरू राहील.
Ladki Bahin Yojana
CM Devendra Fadnavis assures that the Ladki Bahin Yojana will continue without interruption.saam tv
Published On
Summary
  • मुख्यमंत्री फडणवीसांनी लाडकी बहीण योजना सुरूच राहील, असं ठाम आश्वासन दिलंय.

  • नगरपालिकेत भगवा फडकवण्याचे आवाहन

  • लाडकी बहीण योजनेत राज्यातील महिलांना १५०० रुपयाांची मदत मिळते.

स्थानिक निवडणुकीच्या प्रचार सभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेबाबत शब्द दिलाय. अयोध्येच्या मंदिरावर जसा भगवा फडकला तसाच भगवा नगरपालिकेवर फडकवा, असे आवाहन करत मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही अशा शब्द राज्यातील लाडक्या बहिणींना दिलाय.

लाडकी बहीण योजनेवरून विरोधक नेहमी सत्ताधाऱ्यांना घेरत असतात. या योजनेमुळे तिजोरीवर ताण पडतोय. त्यामुळे ही योजना सरकार बंद करेल. निवडणूक जिंकण्यापूर्ती ही योजना सुरू करण्यात आली होती आता सरकार ही योजना बंद करेल, असा आरोप विरोधी पक्षातील नेते करत असतात. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील लाडक्या बहिणींना आश्वस्त केलंय.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: E-KYC कशी करायची? खुद्द आदिती तटकरेंनीच लाडक्या बहिणींना दिली स्टेप बाय स्टेप माहिती

आम्ही निवडणुका जिंकण्यापुरते आश्वासन देणारे लोक नाही तर आम्ही लोकांसोबत राहून त्यांच्या जीवनात परिवर्तन घडविणारे लोक आहोत असं मुख्यमंत्री म्हणालते. महाराष्ट्रातील विजयाला २३ नोव्हेंबरला एक वर्ष पूर्ण झालंय. लोक म्हणत होते आता हे सरकार लाडकी बहीण योजना बंद करणार. पण, माझ्या बहिणींना सांगतो की, जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ होणार नाही, असा शब्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला.

Ladki Bahin Yojana
Ladki bahin Yojana eKYC: लाडकी बहीण योजनेच्या वेबसाइटमध्ये बदल, या महिलांसाठी नवीन eKYC प्रोसेस, कशी असणार? वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

राज्यात आम्हाला मोठा विजय मिळाला. त्यानंतर विरोधक म्हणायचे सरकारनं सुरू केलेल्या योजना बंद होणार, परंतु विरोधकांच्या नाकावर टिच्चून एक वर्ष झाले तरी सर्व योजनांचे पैसे सुरू आहेत. लाडकी बहीण योजना, शेतीला मोफत वीज, पीकविमा, शेतकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय सरकार कधीच बंद करणार नाही.

प्रामाणिकतेने कारभार चालविण्यासाठी भाजपने उमेदवार दिलेत. या निवडणुकीत कुणाला नावे ठेवण्याकरिता, टीका करण्यासाठी आलो नाही. आमच्याकडे प्रत्येक शहराच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट आहे. गावांवर लक्ष देताना शहरावर दुर्लक्ष होत झालं. गावातील लोक शहरात आलेत. पण शहरावर लक्ष न दिल्याने ती बकाल झाली, असे फडणवीस म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com