Ladki bahin Yojana eKYC: लाडकी बहीण योजनेच्या वेबसाइटमध्ये बदल, या महिलांसाठी नवीन eKYC प्रोसेस, कशी असणार? वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Ladki bahin Yojana eKYC Deadline Extended: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना केवायसीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. याचसोबत ज्या महिलांचे पती किंवा वडील हयात नाही त्यांच्यासाठी नवीन केवायसी प्रोसेस सुरु केली आहे.
Ladki bahin Yojana eKYC
Ladki bahin Yojana eKYCSaam Tv
Published On
Summary

लाडकी बहीण योजनेत केवायसीसाठी मुदतवाढ

ज्या महिलांचे पती, वडील हयात नाही त्यांच्यासाठी महत्त्वाचा निर्णय

नवीन केवायसी प्रोसेस सुरु

आदिती तटकरेंनी दिली माहिती

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहेत. केवायसीसाठीची मुदत वाढली आहे. आता लाडक्या बहिणी ३१ डिसेंबरपर्यंत केवायसी करु शकतात. महिला बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान, केवायसी करण्याची मुदत वाढवून दिली आहे. त्याचसोबत राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Ladki bahin Yojana eKYC
Ladki Bahin Yojana: e-KYC मधला पहिला मोठा अडथळा दूर; लाडक्या बहिणींची चिंता मिटली, वेबसाईटमध्ये बदल

पती, वडील हयात नाही अशा महिलांसाठी नवी केवायसी प्रक्रिया (Ladki Bahin Yojana New KYC Process For Widows)

लाडकी बहीण योजनेची केवायसी करताना महिलांना त्यांचे पती किंवा वडिलांचेही केवायसी करायचे असते.ज्या महिलांचे पती आणि वडील हयात नाही, अशा महिलांनी केवायसी कशी करायची असा प्रश्न विचारला जात होता. आता यावर राज्य सरकारने तोडगा काढला आहे. या महिलांसाठी केवायसी प्रक्रियेत बदल केला आहे.

कशी असणार नवी केवायसी प्रोसेस? (Mukhyamantri Ladki Bahin Yojana ekyc link)

लाडकी बहीण योजनेत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाही किंवा घटस्फोट झाला आहे. त्या लाभार्थी महिलांनी वेबसाइटवरुन स्वतःचे केवायसी पूर्ण करावे. त्यानंतर त्यांच्या पती किंवा वडिलांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोटाचे प्रमाणपत्र किंवा मा. न्यायालयाचे आदेश संबंधित जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकाऱ्यांकडे जमा करावेत, यानंतर त्यांची केवायसी पूर्ण होईल. असं आदिती तटकरेंनी सांगितलं आहे.

Ladki bahin Yojana eKYC
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या केवायसीसाठी पात्रता काय? कोण करु शकणार? वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

लाडकीला केवायसीसाठी मुदतवाढ

लाडकी बहीण योजनेत आता केवायसीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. जवळपास कोट्यवधि महिलांचे केवायसी बाकी आहे. त्यांच्यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यातील अनेक ठिकाणी आलेली पूरपरिस्थिती यामुळे अनेक अडचणींमुळे लाडक्या बहिणींने केवायसी करणे शक्य झाले नाही. त्यांच्यासाठी केवायसीसाठी मुदतवाढ दिली आहे.

Ladki bahin Yojana eKYC
Ladki Bahin Yojana: निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना खुशखबर मिळणार! सरकार २ महत्त्वाचे निर्णय घेणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com