Ladki Bahin Yojana: e-KYC मधला पहिला मोठा अडथळा दूर; लाडक्या बहिणींची चिंता मिटली, वेबसाईटमध्ये बदल

Ladki Bahin Yojana Website Update: महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ईकेवायसी समस्या सोडवल्या आहेत. तांत्रिक अडचणींना तोंड देणाऱ्या लाभार्थ्यांची पडताळणी सुलभ करण्यासाठी मंत्री अदिती तटकरे यांनी अधिकृत वेबसाइटमध्ये महत्त्वाचे अपडेट केले जात असल्याची माहिती दिलीय.
Ladki Bahin Yojana Website Update
Aditi Tatkare announces website update to resolve eKYC issues in CM Majhi Laadki Bahin Yojana.saam tv
Published On
Summary
  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ईकेवायसी करणं होणार सुलभ

  • महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी वेबसाईटमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतलाय.

  • या योजनेत पारदर्शकता आणि सुलभता वाढवण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.

महाराष्ट्र सरकारची महत्त्वकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट आहे. ज्या महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत, त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. योजनेतील बोगस लाभार्थ्यांना वगळ्यासाठी सरकारनं ई-केवायसी करण्याचे अनिवार्य केलंय. पण अनेकांना ईकेवायसी करताना तांत्रिक अडचणी येत होत्या. ही बाब लक्षात घेत राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी मोठा निर्णय घेतला. आदिती तटकरेंच्या या निर्णयामुळे केवायसी करण्यामध्ये येणारी समस्या दूर होणार आहे.

Ladki Bahin Yojana Website Update
Traffic challan dispute: चुकीचं ट्रॅफिक चालान आलंय? ऑनलाइन तक्रार कशी करणार?

लाडक्या बहिणींना महिन्याभरापासून ई-केवायसी करताना मोठ्या अडचणी येत होत्या. कधी सर्वर डाऊन, कधी ओटीपी न येणे अशा समस्यांमुळे महिला चिंतेत पडल्या होत्या. यावरून मंत्री अदिती तटकरेंनी वेबसाईटमध्ये बदल होत असल्याचं सांगितलं. यामुळे ई-केवायसीसाठी वेळ लागत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

या योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता १० ऑक्टोबरपर्यंत जमा झाला होता. दिवाळीपूर्वी हा हप्ता जमा होईल अशी अपेक्षा होती. मात्र गेल्या महिन्याभरापासून अनेकांना अडचणी येऊ लागल्या. यावरून मंत्री अदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिलीय.

Ladki Bahin Yojana Website Update
Ladki Bahin Yojana: फक्त ६ दिवस! लाडक्या बहिणींनो मुदतीपूर्वी KYC करा, कोणती कागदपत्रे आवश्यक, स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घ्या

लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटमध्ये काही बदल होत आहेत. त्यामुळे वेळ लागत आहे, अशी माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिलीय. ज्या महिलेचा पती आणि वडील नाही, अशा महिलांसाठी वेबसाईटवर बदल केले जाणार आहेत. ही प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल असं आदिती तटकरेंनी सांगितलं. दरम्यान कोणतीही महिला लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही, अजित पवार यांनी स्पष्ट केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com