अयोध्येतील राममंदिरावर भगवा ध्वज, काय आहे वैशिष्ट्यं ?

अयोध्येतील राममंदिरावर भगवा ध्वज, काय आहे वैशिष्ट्यं ?
Published On
Summary
  • अयोध्येतील राममंदिरावर २२ फूट लांबीचा आणि ११ फूट रुंदीचा भगवा ध्वज फडकवण्यात आला.

  • पॅराशूट फॅब्रिक आणि रेशमी धाग्यांनी तयार झालेल्या या ध्वजावर ओम, सूर्य आणि कोविदार अशी तीन चिन्हे आहेत.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत यांनी विवाह पंचमी निमित्त ध्वजारोहण केले.

  • ८ हजार निमंत्रितांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाने रामभक्तांसाठी ऐतिहासिक क्षण निर्माण केला.

अयोध्येतील राममंदिरावर भगवा ध्वज फडकवण्यात आलाय... या ध्वजाचं नेमकं वैशिष्ट्य काय आहे? रामभक्तांसाठी ध्वजारोहणाचा दिवस ऐतिहासिक का ठरला? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

अयोध्येचं राम मंदिर आता सर्वार्थानं पूर्ण झालंय... विवाह पंचमीच्या उत्सवानिमित्त रामललाच्या शिखरावर ध्वजारोहण संपन्न झालंय.. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांनी एकत्रितपणे नमस्काराच्या आकारातील चिन्ह फिरवून भगवा ध्वज आरोहित केला.. बरोब्बर ठरलेल्या मुहुर्तावर म्हणजे 11 वाजून 50 मिनिटांनी ध्वजारोहण करण्यात आलंय. यावेळी मोदींनी देशवासियांना संबोधून ध्वजाबाबतच्या आपल्या भावना व्यक्त केल्या.

या ध्वजाचं काय वैशिष्ट्यं आहे ते पाहूयात....

शिखरावरील ध्वज खराब होऊ नये, यासाठी पॅराशूट फॅब्रिक आणि रेशमाच्या धाग्यांपासून ध्वजाची निर्मिती केलीय...हा ध्वज 22 फूट लांब आणि 11 फूट रुंद असेल... मंदिराच्या शिखरावर 42 फूट उंच ध्वजस्तंभावर हा ध्वज फडकवण्यात आलाय. ध्वजस्तंभ 360 अंश फिरणाऱ्या चेंबरवर बसवण्यात आलाय.. या ध्वजावर ओम, सूर्य आणि कोविदार म्हणजे कांचन वृक्ष अशी तीन चिन्ह आहेत.

अयोध्येतील राममंदिरावर भगवा ध्वज, काय आहे वैशिष्ट्यं ?
Local Body Election : महाराष्ट्रात घराणेशाहीचा सिक्सर,शिंदेसेनेत एकाच घरात 6 उमेदवार

या समारोहासाठी देशभरातून 8 हजार निमंत्रितांना अयोध्येत आमंत्रण दिलं गेलं होतं. मोदींनी ध्वजारोहणापुर्वी अयोध्येच्या मंदिरासमोरील राजमार्गावरून रोड शो केला.. त्यानंतर मोदींच्या हस्ते मंदिरावरचा भगवा ध्वज फडकवण्यात आला. त्यामुळे रामभक्तांसाठी हा दिवस ऐतिहासिक ठरला.

अयोध्येतील राममंदिरावर भगवा ध्वज, काय आहे वैशिष्ट्यं ?
Supreme Court : निवडणूक आरक्षणावर कोर्टात काय झालं? सर्वोच्च न्यायालयाने सरकार अन् आयोगाला झापलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com