Baramati News : बारामती शहरात एनसीपीचे (NCP) ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar News) यांच्या समर्थनार्थ सुलतान ग्रुप आणि मुस्लिम समाजाच्या वतीने शहरात गुणवडी चौकात बॅनर्स लावण्यात आले होते. हे बॅनर्स हटवण्याबाबत बारामती पालिकेच्या (baramati muncipal council) कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केला. परंतु सुलतान ग्रुपच्या कार्यकर्ते आक्रमक हाेत त्यांचा प्रयत्न हाणून पाडला.(Maharashtra News)
सुलतान ग्रुपचे कार्यकर्ते म्हणाले अजित पवार (ajit pawar latest news) यांनी भाजप पक्षाशी घेतलेलेली जवळीक आम्हांला मान्य नाही. त्यांचा निर्णय मुस्लिम समाजाच्या विरोधात असल्याचे ग्रुपमधील काही युवकांनी म्हटलं. ते म्हणाले गेले चार दिवसांपासून अजितदादांचा फलक लागला. त्याबाबत आम्ही काही बाेललाे नाही पण आम्ही आमचे नेते पवार साहेब यांच्या समर्थनार्थ फलक लावला तर ताे काढा म्हणून पाेलिस आणि पालिका सांगत आहे.
काेणाचा कितीही दबाव आला तरी आमचे सदैव समर्थन हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पाठीशी राहणार आहे. आमच्यावर कायदेशिर झाली तर चालेल परंतु आम्ही बॅनर काढणार नाही असे प्रशासनास सांगितले.
दरम्यान यावेळी काही युवकांनी अजित पवार यांनी भाजप बरोबर हातमिळवणी केल्याने आमच्या समाजात नाराजी परसली आहे असे सांगितले. याचे प्रमुख कारण म्हणजे भाजपची विचारधारा ही मुस्लिम समाजाच्या विराेधातील आहे असेही युवकांनी स्पष्ट केले.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.