Solapur News : 'त्या' प्रकरणात भाजप खासदार डाॅ. जयसिद्धेश्वरांना उच्च न्यायालयातून दिलासा

dr jaisiddeshwar shivacharya mahaswami news : सहा महिन्यानंतर सादर हाेणार नवीन अहवाल.
mp dr jaisiddeshwar shivacharya mahaswami
mp dr jaisiddeshwar shivacharya mahaswamisaam tv
Published On

Solapur News : भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी (mp dr jaisiddeshwar shivacharya mahaswami) यांचा जातीचा दाखला रद्द करण्याचा विभागीय जात पडताळणी समितीचा निर्णय उच्च न्यायालयाने रद्द केल्याची माहिती अॅड. महेश स्वामी यांनी दिली. (Maharashtra News)

mp dr jaisiddeshwar shivacharya mahaswami
Saam Impact: ब्रहानपूर- अंकलेश्वर महामार्गाच्या शहादा ते सारंगखेडा रस्त्याची डागडूजी सुरु

सोलापूर लोकसभा मतदारसंघ (solapur lok sabha constituency) अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. खासदार डॉ. जयसिद्धेश्वर यांनी निवडणुकीसाठी बेडा जंगम जातीचा दाखला सादर केला होता. हा दाखला बोगस असल्याची तक्रार प्रमोद गायकवाड, मिलिंद मुळे, विनायक कंडकुरे यांनी केली होती.

mp dr jaisiddeshwar shivacharya mahaswami
Shirdi News: भाविकांचे दातृत्व, शिर्डीतील दानपेटीत तीन काेटींची वाढ; 2 लाख भाविकांनी घेतला साईंचा आशीर्वाद

खासदारांनी बोगस कागदपत्रांच्या आधारे जातीचा दाखला मिळविल्याचे तक्रारदारांचे म्हणणे होते. विभागीय जात पडताळणी समितीने चौकशी करून हा दाखला रद्द केला. अक्कलकोटच्या (akkalkot) तहसीलदारांना खासदारांचा जातीचा दाखला रद्द करण्याचे आदेशही दिले.

तहसीलदारांनी या प्रकरणात जयसिद्धेश्वर यांच्यावर गुन्हा दाखल करावा असेही या आदेशात म्हटले होते. या निर्णयाविरुद्ध डॉ. जयसिद्धेश्वर यांनी अॅड. अनुप पाटील यांच्यामार्फत उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

विभागीय समितीने पुन्हा चाैकशी करावी

या याचिकेवर बुधवारी (court) न्यायमूर्ती सुनील शुकरे आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्यासमोर सुनावणी झाली. न्यायमूर्तीनी विभागीय समितीचा दाखला रद्दचा निर्णय रद्द ठरविला. विभागीय समितीने या प्रकरणात पुन्हा चौकशी करावी. सहा महिन्यांच्या आत यासंदर्भात निर्णय घ्यावा असे आदेश दिल्याचे अॅड. महेश स्वामी यांनी सांगितले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com