Saam Impact: ब्रहानपूर- अंकलेश्वर महामार्गाच्या शहादा ते सारंगखेडा रस्त्याची डागडूजी सुरु

ब्रहानपूर - अंकलेश्वर हा महामार्ग नंदुरबार जिल्ह्यातून जात असून महाराष्ट्राला गुजरात आणि मध्य प्रदेशला जोडणारा महत्त्वाच्या महामार्ग आहे.
Saam Impact, brahmanpuri ankleshwar highway, shahada sarangkheda road
Saam Impact, brahmanpuri ankleshwar highway, shahada sarangkheda roadsaam tv
Published On

- सागर निकवाडे

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील शहादा ते सारंगखेडा (shahada sarangkheda) रस्त्यावर खड्ड्यांच्या साम्राज्य पसरलं होते. या ब्रहानपूर अंकलेश्वर महामार्गाच्या (brahmanpuri ankleshwar highway) रस्त्याची दूरावस्था आणि त्यामुळे जनतेस हाेत असलेला त्रास साम टिव्हीने प्रसारित केला. त्याची तातडीने प्रशासनाने दखल घेत रस्त्याची दुरुस्ती करण्यास प्रारंभ केला. (Maharashtra News)

Saam Impact, brahmanpuri ankleshwar highway, shahada sarangkheda road
Congress आमदारांचे Mahavitran च्या कारभारा विराेधात बेमुदत उपाेषण सुरु

नंदुरबार (nandurbar) जिल्ह्यातून जाणारा ब्रहानपूर अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्ग आहे. या महामार्गाची दयनीय अवस्था झाली आहे. या महामार्गाचे दुरुस्ती करण्यासाठी अनेक संघटनांनी आंदोलन, निवेदने देऊन दुरुस्ती करण्यास विनंती केली होती. मात्र संबंधित प्रशासनाकडून टाळाटाळ केली. साम टीव्हीने रस्त्याची अवस्था दाखविताच प्रशासन जागे झाले आणि रस्त्याची दुरुस्ती सुरु केली.

Saam Impact, brahmanpuri ankleshwar highway, shahada sarangkheda road
How can snails be controlled ? शेतकरी मित्रांनो ! गोगलगायपासून सावधान, वाचा कृषी विद्यापीठाचा महत्त्वपूर्ण सल्ला

यापुर्वी ब्रहानपूर - अंकलेश्वर या महामार्गावरील गोमाई नदीच्या पुलावर बांधण्यात आलेल्या पुलाची दुरवस्था झाली होती. या पुलावरील खड्ड्यांची बातमी साम टीव्हीने दाखवल्यानंतर प्रशासनाने दखल घेत या पुलाची देखील दुरुस्ती केली हाेती.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com