Pune News : नामांकित शाळेत मुलींच्या स्वच्छतागृहात सीसीटीव्ही कॅमेरे, बंजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी मुख्याध्यापकास चाेपला

या प्रकरणी पाेलिसांत काेणत्याही प्रकारची तक्रार दाखल झालेली नाही.
Maval News
Maval Newssaam tv

Maval News : मावळ तालुक्यातून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. तळेगाव आंबी येथील एका नामांकित शाळेत मुलींच्या स्वच्छतागृहात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले हाेते. त्याची चर्चा हाेताच शाळा व्यवस्थापनाने ते कॅमेरे काढून टाकले. दरम्यान या प्रकाराची माहिती बजरंग दलाच्या (bajrang dal) कार्यकर्त्यांना समजताच त्यांनी शाळेच्या मुख्याध्यापकास चांगलाच धडा शिकवला. (Maharashtra News)

Maval News
Pune Nashik Accident News : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिका-यासह अंगरक्षक अपघातातून बचावले

मावळ (maval) तालुक्यातील अनेक विद्यार्थी संबंधित शाळेत शिक्षण घेण्यासाठी येतात. ही एक नावाजलेली शाळा असल्याने या शाळेत अनेक पालकांनी मुलांचा प्रवेश घेतला आहे. जून महिन्यात शाळा सुरू झाली. जुलैच्या पहिल्या आठवड्यात शाळेतील मुलींच्या स्वच्छतागृहात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले.

Maval News
Pot Holes At Mumbai Goa Highway : मुंबई गोवा महामार्गाची खड्डयांमुळे पुन्हा चाळण, वाकेडनजीक रस्ता खचला

मुख्याध्यापकांवर पालकांचा आराेप

ही बाब शाळेतील मुलींनी पालकांना (parents) सांगितली. याबाबत पालकांनी शाळा प्रशासनाला विचारले असता त्यांनी मुख्याध्यापकांनी कॅमेरे बसविण्याच्या सूचना दिल्या असल्याचे सांगण्यात आले. दुसरीकडे मुख्याध्यापक हे इतर शिक्षकांच्या मदतीने येथील मुलांना जबरदस्तीने ख्रिश्चन धर्माचे शिक्षण देताहेत असा आराेप देखील त्यांच्यावर झाला.

या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी पालकांनी करुन जोपर्यंत या घटनेबाबत शाळा प्रशासन दोषींवर ठोस कारवाई करत नाही तोपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा पवित्रा घेतला.

Maval News
How can snails be controlled ? शेतकरी मित्रांनो ! गोगलगायपासून सावधान, वाचा कृषी विद्यापीठाचा महत्त्वपूर्ण सल्ला

बजरंग दल आक्रमक

दरम्यान शाळा प्रशासनाला बजरंग दल कार्यकर्ते यांनी जाब विचारले असता शाळा प्रशासनाने मौन बाळगले. त्यामुळे शाळेत केवळ मुलींच्या स्वच्छतागृहातच कॅमेरे का बसविण्यात आले याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

मावळ भाजप जाब विचारणार

शाळेत मुलींच्या स्वच्छता गृहात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आल्यानंतर मावळ भाजपकडे पालकांनी तक्रारी केल्या. मावळ भाजपने आक्रमक भूमिका घेतली असून रवींद्र भेगडे (तालुका अध्यक्ष मावळ भाजप) यांनी व्यवस्थापनास जाब विचारणार असल्याचे म्हटलं आहे.

Maval News
Solapur News : 'त्या' प्रकरणात भाजप खासदार डाॅ. जयसिद्धेश्वरांना उच्च न्यायालयातून दिलासा

गटशिक्षणाधिकारी यांनी नेमली चाैकशी समिती

या प्रकाराबाबत मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी तातडीने मावळ गटशिक्षणाधिकारी यांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तर गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तात्काळ समिती नेमून संबंधित शाळेबाबतचा (school) अहवाल सादर करण्याचा सूचना दिल्या आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com