Bogus Crop Insurance Saam tv
ऍग्रो वन

Bogus Crop Insurance : फळबागांमध्ये बनवेगिरी; फळबागा नसतानाही पिक विमा लाटला, अडीच हजारावर शेतकरी अडकले

Ahilyanagar News : राज्यामध्ये २०२४-२५ या वर्षात ७३ हजार ७७७ शेतकऱ्यांनी फळबागा लागवडीसाठी नोंद केली आहे. तर ५० हजार ४४३ विमा क्षेत्र संरक्षित करण्यात आले होते. त्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यात १३ हजार ८५ शेतकऱ्यांनी विम्यासाठी सहभाग नोंदवला होता.

Rajesh Sonwane

सुशील थोरात 

अहिल्यानगर : नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान होत असते. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत असून हे नुकसान टाळण्यासाठी शासनाने पीक विमा योजना सुरु करत पिकांना संरक्षण देण्याचे काम केले आहे. मात्र यात फळबागांच्या पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी बनवेगिरी करत फळबागा नसताना देखील विम्याची रक्कम लागल्याचा प्रकार अहिल्यानगर जिल्ह्यात समोर आला आहे. 

राज्यामध्ये २०२४-२५ या वर्षात ७३ हजार ७७७ शेतकऱ्यांनी फळबागा लागवडीसाठी नोंद केली आहे. तर ५० हजार ४४३ विमा क्षेत्र संरक्षित करण्यात आले होते. त्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यात १३ हजार ८५ शेतकऱ्यांनी विम्यासाठी सहभाग नोंदवला होता. मात्र कृषी विभागाने मागील वर्षी आढळून आलेल्या बोगस अर्जाची संख्या पाहता पुन्हा एकदा सर्व क्षेत्रांची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अहिल्या नगर जिल्ह्यामध्ये १४ तालुक्यात २ हजार २५ ठिकाणी फळबागा नसतानाही विमा उतरविल्याचे आढळून आले. 

१२७४ क्षेत्र दाखविल्या बनावट फळबागा 

अहिल्यानगर जिल्ह्यात फळबागा लागवड केली नसताना देखील पिक विमा लाटण्याचा प्रकार कृषी विभागाच्या तपासणीत उघडकीस आला आहे. जिल्ह्यामध्ये फळबागा नसताना देखील विमा उतरविण्यात आला तसेच लागवडीपेक्षा जास्त क्षेत्र विम्यासाठी शेतकऱ्यांकडून दाखविले गेले. मात्र कृषी विभागाने केलेल्या तपासणीत २ हजार ७२४ शेतकऱ्यांनी तब्बल १२७४ हेक्टर क्षेत्र हे बनावट चुकीच्या पद्धतीने फळबागा नसताना देखील पिक विमा उतरवला होता. 

शासनाचे ९० लाख वाचले 

कृषी विभागाच्या सदरचा प्रकार लक्षात आल्याने कृषी विभागाने २ हजार ७२४ शेतकऱ्यांच्या पिक विमाचे अर्ज बाद केले आहे. तसा प्रस्ताव देखील राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. दरम्यान कृषी विभागाने हे प्रकरण उघड केल्यामुळे शासनाचे तब्बल ८९ लाख ४४ हजार रुपये वाचले आहे. दरम्यान अडीच हजारांच्यावर शेतकऱ्यांचे बोगस क्षेत्र रद्द करण्यात आले असल्याची माहिती अहिल्यानगर जिल्ह्याचे कृषी अधीक्षक सुधाकर बोराडे यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

SCROLL FOR NEXT