Parbhani News : टाकाऊ वस्तु पासून वनराई बंधाऱ्याची निर्मिती; शेतकऱ्यांची श्रमदानातुन नाल्यावर केली बांधणी

Parbhani jintur News : परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात पाझर तलाव, सिंचन तलाव मोठ्या प्रमाणात असल्यामुळे छोटे मोठे ओढे नाले आहेत. या नाल्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असते.
Parbhani News
Parbhani NewsSaam tv
Published On

परभणी : नदी- नाल्यातील पाणी वाहून जात असते. वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी बंधारा बांधल्यास फायदा होत असतो. याकरिता शासकीय योजनेतंर्गत निधी मंजूर होण्याची वाट पाहावी लागते. मात्र जिंतूर तालुक्यातील अंगलगाव येथील शेतकर्‍यांनी एकत्र जमून शेतातून जाणार्‍या नाल्यावर कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली श्रमदानातुन वनराई बंधारा तयार केला आहे. इतकेच नाही तर या शेतकऱ्यांनी टाकाऊ वस्तूंपासून हा बंधारा बांधून वेगळा आदर्श निर्माण केला आहे. 

परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात पाझर तलाव, सिंचन तलाव मोठ्या प्रमाणात असल्यामुळे छोटे मोठे ओढे नाले आहेत. या नाल्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असते. म्हणून वाया जाणार्‍या पाण्याला अडवून पाणी जमिनीत जिरवले; तर विहीर व बोर यांची पाणी पातळीत वाढ होते. याचसाठी शेतकऱ्यांनी नाल्यातील वाहून जाणारे पाणी अडविण्याचा निर्णय घेतला.  

Parbhani News
Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवड शहरात बनावट विदेशी मद्याचा कारखाना उद्ध्वस्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

२५० बॅगचा वापर 

जिंतूर तालुक्यातील अंगलगाव येथील शेतकर्‍यांनी एकत्र येत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी एल. ए. शिंदे, तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसहभागातून वनराई बंधारा बांधण्यात आला. सदर बंधारा हा २५० बॅगचा असून जवळपास ४ तास ५० शेतकर्‍यांनी श्रमदान केले. टाकावू वस्तूपासून शेतकर्‍यांनी श्रमदानातून हा बंधारा तयार केला आहे. बंधार्‍यात ५० फुट रुंद, ६०० फूट लांब आणि जवळपास ५ फुट खोल एवढा नाल्यामध्ये पाठीमागे पाणी साठा होणार आहे. 

Parbhani News
Garlic Price : लसणाच्या दरात दुपटीने वाढ; पालेभाज्यांचे दरही कडाडले

आणखी दहा बंधारे उभारणार 

बंधारा बांधल्याने नाल्या लगतच्या शेतकर्‍यांना गहु, ज्वारी व हरभरा या पिकांना संरक्षित पाणी देण्यासाठी उपलब्ध होऊन जवळपास १५ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. त्यामुळे लगतच्या विहिरीची पाणी पातळीत वाढ होण्यास मदत होईल यामुळे शेतकर्‍यांच्या उत्पादनात नक्कीच वाढ होणार आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारचे गावात १० वनराई बंधारे बांधण्याचे शेतकरी व गावकर्‍यांनी संकल्प केला असून लवकरच ते पूर्ण करणार आहेत.

हा वनराई बंधारा तयार करण्यासाठी कृषी सहाय्यक जी. टी. राठोड व शेती शाळेतील शेतकरी यांनी किशोर शेळके मंडळ कृषि अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करून गावकर्‍यांच्या मदतीने बंधारा पुर्ण केला. याकामी गावातील सरपंच, माजी सरपंच, पोलीस पाटील, प्रगतशील शेतकरी, शेती शाळेतील सर्व शेतकरी आणि कृषी विभागातील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com