अजय सोनवणे
मनमाड (नाशिक) : गेल्या १० दिवसापासून नाशिक जिल्ह्यातील (Nashik) बाजार समिती मधील कांदा लिलाव ठप्प झाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून यावर तोडगा म्हणून व्यापारी व (Farmer) शेतकऱ्यांनी एकत्र येत खाजगी जागेवर जाऊन कांदा लिलाव करण्यास सुरवात केली आहे. (Tajya Batmya)
नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या वेगवेगळ्या कारणांमुळे बंद असल्याने मागील १० दिवसांपासून कांदा लिलाव प्रक्रिया बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी होऊन कांदा विक्रीला नेता येत नसल्याने (Bajar samiti) बाजार समितीसह शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. परिणामी बाजार समितीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. गेल्या काही दिवसांपासून आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांनी व व्यापाऱ्यांनी मिळून खाजगी जागेत जात (Onion) कांदा लिलाव प्रक्रिया पार पाडण्यास सुरवात केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळाला आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
हमाली, तोलाईही वाचली
व्यापारी व शेतकऱ्यांनी एकत्रित येत उमराने येथे खाजगी जागेत कांदा लिलाव सुरू केले. त्याला शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला असून साधारण १४०० ते १५०० रुपयांचा भाव मिळाला. विशेष म्हणजे खाजगी जागेत लिलाव सुरू असल्याने या ठिकाणी कुठल्याही प्रकारची हमाली, तोलाई, वराई शेतकऱ्यांकडून कपात केली जात नसल्याने त्याचा फायदा व्यापारी व शेतकऱ्यांना होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.