

- सुशिल थाेरात
Nagar News : राज्यात सध्या अनेक भागात पावसाने ओढ दिली आहे. त्याचा परिणाम हा जसा शेती पिकांवर झाला आहे तसाच त्याचा परिणाम दुग्ध व्यवसायावर देखील झाला आहे. चारा टंचाईमुळे दूधाचे उत्पादन कमी हाेऊ लागले आहे. परिणामी शेतकरी चिंतेत पडले आहेत.(Maharashtra News)
नगर तालुक्यातील गुंडेगाव भागात श्रावण महिना सुरू झाला तरी पावसाने दांडी मारल्याने ऊस, मका पिकासह अन्य पिकेही काही प्रमाणात धोक्यात आली आहेत. त्यामुळे दुधाची पंढरी ओळख असणाऱ्या गुंडेगाव भागात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. याचा परिणाम दूध व्यवसायावर होत आहे.
नगर जिल्ह्यातील गुंडेगाव हे गाव दुग्धव्यवसायासाठी ओळख जातं. गुंडेगाव हे नगर तालुक्यातील अतिशय छोटेसे गाव असेल तरी गावात दररोज 12 ते 13 हजार लिटर दुध संकलन होत असे.
परंतु मागील दोन महिन्यांपासून पावसाने ओढ दिल्याने या गावात चारा टंचाईने डोकंवर काढले आहे. स्वाभाविकच चारा टंचाई भासू लागल्याने त्याचा परिणाम हा दुग्धव्यावसायावर देखील झाला आहे.
गावातील दूध संकलन जवळपास 4 हजार लिटीरने कमी झाल्याचे गावकरी सांगतात. दुग्ध व्यवसायिकांचं आर्थिक गणित पुरतं कोलमडलं आहे. ज्याचा परिणाम इतरही व्यवसायांवरती झाल्याचा ग्रामस्थ सांगतात.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.