108 Ambulance Drivers Call Strike : 'बीव्हीजी' ने शब्द पाळला नाही, 108 आरोग्य सेवा रुग्णवाहिका चालक निघाले संपावर

ग्रामीण भागात या रुग्णसेवेचा फायदा हाेत आहे.
108 Ambulance, ambulance drivers,
108 Ambulance, ambulance drivers,saam tv
Published On

- सुशील थोरात

Nagar News : विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी १०८ रुग्णवाहिका चालकांनी एक सप्टेंबर पासून काम बंद आंदोलनचा इशारा दिला आहे. राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांतील चालक संपात सहभागी होणार आहेत. यामुळे रुग्णांचे हाल हाेण्याची शक्यता वर्तवली जात आहे (Maharashtra News)

108 Ambulance, ambulance drivers,
NCP vs NCP : यापुढं काकांचा फाेटाे बॅनरवर वापरणार नाही! पुतण्याने दिली ग्वाही; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनाही आवाहन

राज्यात २०१४ पासून रुग्णांसाठी मोफत १०८ रुग्णवाहिका सुरू करण्यात आली आहे. तेव्हापासून ते 2023 पर्यंत या रुग्णवाहिकांवर काम करणाऱ्या वाहन चालकांची अनेक प्रश्न मार्गी लागले नसल्यामुळे रुग्णवाहिकांवरील चालकांनी विविध मागण्यांसाठी एक सप्टेंबरपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

108 Ambulance, ambulance drivers,
Loksabha Election 2024: आनंदित झालेल्या शरद पवारांनी शाहू महाराज यांच्या लाेकसभेच्या तिकिटाविषयी स्पष्ट सांगितलं (पाहा व्हिडिओ)

नगर जिल्ह्यातील जवळपास 42 चालक काम बंद आंदोलनात सहभागी होणार असल्याने जिल्ह्यातील रुग्णांचे हाल होण्याची शक्यता आहे. या बंदमुळे रुग्णालयांमधील रुग्णांना ने आण करण्याचे काम ठप्प होऊ शकते.

108 Ambulance, ambulance drivers,
Shravan Maas 2023: श्रावणात केळीचा दर भडकणार? शेतकरी सुखावला, कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळाला उच्चांकी भाव

१०८ रुग्णवाहिकांवर वाहक नियुक्त करण्याची जबाबदारी बीव्हीजी कंपनीकडे देण्यात आली आहे. आरोग्य मंत्री तानाजी सावंत (tanaji sawant) यांच्या समवेत झालेल्या चर्चेनंतर बीव्हीजी कंपनीकडून दिलेले आश्वासन पाळले गेले नाही असा आराेप चालकांनी केला आहे.

कर्नाटक, तामिळनाडू राज्यात चालकांना आठ तासासाठी तीस हजार रुपये, तर बारा तासांसाठी 38 हजार रुपये वेतन देण्यात येते. परंतु महाराष्ट्र राज्यात बारा तासांसाठी 16 ते 19 हजार रुपये वेतन देण्यात येत आहे.

कमी पगारात कुटुंब कसे चालवायचे हा प्रश्न रुग्णवाहिका चालकांसमोर उभा राहिला आहे. दरम्यान तत्काळ मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा १०८ रुग्णवाहिकेच्या चालकांनी दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com