Aalephata Kanda Market Bazar Bhav : शेतकरी पुन्हा एकदा लखपती हाेणार? कांद्याला विक्रमी दर

दर चांगला मिळत असल्याने शेतक-यांत समाधान असल्याचे चित्र बाजार समितीत आहे.
Onion, alephata kanda market bazar bhav
Onion, alephata kanda market bazar bhavSaam tv
Published On: 

Onion Price : कांद्याला ३ हजार रुपये प्रति क्विंटलचा विक्रमी बाजारभाव मिळु लागला आहे. यामुळे साठवणुकीतला कांदा आळेफाटा बाजार समितीत दाखल होऊ लागला आहे. परिणामी बाजार समिती आवारात वाहनांच्या रांगाच रांगा दिसू लागल्या आहेत. (Maharashtra News)

Onion, alephata kanda market bazar bhav
Pune Metro : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी, गुरुवारपासून मेट्राेच्या वेळेत बदल, जाणून घ्या नवा निर्णय

जुन्नरमध्ये टोमॅटोनंतर नंतर आता कांद्याने भाव खाल्ला आहे. त्यातच नाफेडने खरेदी केलेला कांदा बाजारात येण्यासाठी कांद्याची विक्री व्हावी यासाठी जुन्नर तालुक्यातील शेतक-यांनी साठवणुकीतला कांदा बाजारात आणला आहे.

Onion, alephata kanda market bazar bhav
Shravan Mass 2023 : व्हीआयपी दर्शन सुविधा बंदनंतर भाविकांसाठी त्र्यंबकेश्वर देवस्थानचा आणखी एक माेठा निर्णय; ग्रामस्थांनाे! जाणून घ्या नियमावली

साठवणुकीतला कांद्याची विक्रमी आवक होऊनही बाजारभाव चांगला मिळत असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. पुढील काही दिवस असाच बाजारभाव राहिल्यास शेतकरी पुन्हा एकदा लखपती होतील अशी शक्यता आहे.

Onion, alephata kanda market bazar bhav
Dharmik Paryatan: तुळजापूर, भिमाशंकर, कौंडण्यपूर, जेजूरी, त्र्यंबकेश्वरसह राज्यातील मंदिरांत भाविकांची मांदियाळी (पाहा व्हिडिओ)

दरम्यान नाफेडची खरेदी कांदा बाजारात आल्यास कांद्याची आवक वाढुन बाजारभाव पडेल असल्याची भिती शेतकरी व्यक्त करत आहेत. यापुर्वी वातावरणातील बदल,आणि पाऊसामुळे साठवणुकीतील कांद्याची नुकसान झाले. त्यामुळे वाढत्या बाजारभावामुळे कांद्याचे नुकसान भरुन निघत असल्याने शेतक-यांना वाढत्या बाजारभावामुळे आधार मिळत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.