Pune Metro : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी, गुरुवारपासून मेट्राेच्या वेळेत बदल, जाणून घ्या नवा निर्णय

प्रवाशांना अधिक अधिक सुविधा मिळाव्यात यासाठी मेट्राेचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले.
Pune Metro, Ajit Pawar
Pune Metro, Ajit PawarSaam TV

- सचिन जाधव

Pune Metro Rail News : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी मेट्रोतून प्रवास केला होता. या दरम्यान पवार यांनी प्रवाशांशी संवाद साधला. या संवादातून मेट्राची वेळ ही सकाळी लवकर असावी असा सूर उमटला हाेता. त्यानूसार मेट्राेने आता १७ ऑगस्ट पासून मेट्राे सकाळपासून धावेल असे सूताेवाच दिले आहेत. (Maharashtra News)

Pune Metro, Ajit Pawar
Kolhapur Police Alert: रांगड्या काेल्हापुरवर दहशतवाद्यांची नजर? अंबाबाई मंदिर, धरणांवर पाेलिसांचा वाॅच : एसपी महेंद्र पंडीत

प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन येत्या १७ ऑगस्ट पासून पुणे मेट्रो सकाळी ६ वाजल्यापासून धावणार आहे अशी माहिती मेट्राेच्या अधिका-यांनी साम टीव्हीला दिली. सिव्हिल कोर्ट पासून सर्व मार्गावर मेट्रो जात असल्याने पुणे स्टेशन येथून मुंबईला जाणारी सकाळची ७.१५ वाजताची डेक्कन क्वीन पकडणे नाेकरदारांसह मुंबईला जाणा-यांना शक्य होणार आहे.

Pune Metro, Ajit Pawar
Sambhaji Bhide : संभाजी भिडेंच्या उपस्थितीत उद्या हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्यदिन पदयात्रा, धारक-यांनाे वाचा पाेलिसांची नियमावली

दरम्यान मागणी आल्यास मेट्रोची (pune metro) सध्याची रात्रीची कमाल वेळ १० ऐवजी ११ करण्यात येईल असा मेट्रोचा विचार आहे. त्यामुळे प्रवाशांना अधिक सुलभ हाेईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com