Raja Shivaji Advance Booking SAAM TV
मनोरंजन बातम्या

Raja Shivaji Advance Booking : 'राजा शिवाजी'ची तुफान क्रेझ, रितेश देशमुखच्या चित्रपटाची रिलीज आधीच बंपर कमाई

Riteish Deshmukh-Raja Shivaji : रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' चित्रपट १ मे ला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगमध्येच बंपर कमाई केली आहे. कलेक्शन वाचा.

Shreya Maskar

'राजा शिवाजी' चित्रपट १ मे ला थिएटरमध्ये प्रदर्शित होईल.

रितेश देशमुख चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत झळकणार

'राजा शिवाजी' ने ॲडव्हान्स बुकिंगमध्ये बक्कळ कमाई केली.

रितेश देशमुखचा ड्रीम प्रोजेक्ट 'राजा शिवाजी' १ मे म्हणजेच उद्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रिलीज आधीच चित्रपटाचा बोलबाला पाहायला मिळत आहेत. 'राजा शिवाजी'ने प्रदर्शनापूर्वी बंपर कमाई केली आहे. 'राजा शिवाजी'च्या हिंदी आवृत्तीला २८ एप्रिल रोजी 'केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळा'कडून (CBFC) 'U/A 16+' प्रमाणपत्र प्राप्त झाले. प्रमाणपत्राच्या तपशिलानुसार, या चित्रपटाचा कालावधी १८७ मिनिटे आणि ५ सेकंद (३ तास, ७ मिनिटे) इतका आहे.

'राजा शिवाजी'च्या मराठी आवृत्तीला २४ एप्रिल रोजी प्रमाणपत्र देण्यात आले होते. या आवृत्तीचा कालावधी १९५ मिनिटे आणि ५ सेकंद (३ तास, १५ मिनिटे) इतका होता. याचाच अर्थ असा की, हिंदी आवृत्तीचा कालावधी मराठी आवृत्तीपेक्षा नेमका ८ मिनिटांनी कमी आहे. यामुळे, प्रामुख्याने मराठी प्रेक्षकांसाठी तयार करण्यात आलेल्या मूळ आवृत्तीपेक्षा हिंदी आवृत्ती वेगळी ठरते. आता या चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगमध्ये किती कमावले, जाणून घेऊयात.

'राजा शिवाजी' ॲडव्हान्स बुकिंग किती?

Sacnilk च्या रिपोर्टनुसार, 'राजा शिवाजी' चित्रपटाची आतापर्यंत मराठी आणि हिंदी आवृत्त्यांसाठी ६०,००० हून अधिक तिकिटे विकली गेली आहेत. चित्रपटाने अंदाजे ₹२.१६ कोटींची कमाई केली आहे. केवळ मराठी 2D शोसाठीच ५८,५०० हून अधिक तिकिटांची विक्री झाली आहे.

'राजा शिवाजी' तगडी स्टारकास्ट

'राजा शिवाजी' या चित्रपटात रितेश देशमुख याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात जिनिलिया देशमुख, संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, फरदीन खान, भाग्यश्री, सचिन खेडेकर, अमोल गुप्ते आणि जितेंद्र जोशी यांच्यासह अनेक मोठे कलाकार पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची निर्मिती रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांच्या 'मुंबई फिल्म कंपनी' अंतर्गत, तसेच ज्योती देशपांडे यांच्या 'जिओ स्टुडिओज'च्या सहयोगाने करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : उद्यापासून यवतमाळ जिल्ह्यात जनगणनेला सुरुवात

Mumbai Goa Highway : कोकणवासीयांचा प्रवास होणार सुसाट! मुंबई गोवा महामार्ग ९० टक्के पूर्ण, फक्त या ठिकाणाचे काम सुरू

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आठव्या वेतन आयोगाबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय

Short Hair Styling Tips: छोट्या केसांसाठी सोप्या आणि हटके 5 हेअरस्टाईल

IPL 2026 Playoff Scenario: ...तरच मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये जाणार!

SCROLL FOR NEXT