रितेश देशमुख दिग्दर्शित 'राजा शिवाजी' चित्रपट १ मे ला रिलीज होणार आहे.
'राजा शिवाजी' चित्रपटाचे नवीन गाणे रिलीज झाले आहे.
'राजा शिवाजी' चित्रपटात रितेश देशमुख शिवरायांच्या भूमिकेत दिसणार.
सध्या सर्वत्र रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाची चर्चा पाहायला मिळत आहे. अशात आता 'राजा शिवाजी' सिनेमाचे दुसरे गाणे रिलीज झाले आहे. जे सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हे गाणे अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केले आहे. गाणे ऐकताच छाती गौरवाने भरून येईल. 'राजा शिवाजी' चित्रपटातील 'छत्रपती' गाण्याला देखील चाहत्यांनी भरपूर प्रेम दिले.
'राजा शिवाजी' चित्रपटाच्या नवीन गाण्याचे नाव 'जय शिवराय' असे आहे. यात शिवाजी महाराजांचे रुप पाहून आणि गाणे ऐकून तुमच्या अंगावर नक्कीच काटा येईल. या चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराजांची यशोगाथा पाहायला मिळणार आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर जिवंत होणार आहे. दमदार ताल, बीट्स आणि भव्य ऑर्केस्ट्रा पार्श्वभूमीवर ऐकू येत आहे. 'राजा शिवाजी' हा रितेश देशमुखचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. या गाण्याची एक छोटी झलक रितेशने इन्स्टाग्रामवर पोस्ट करून चाहत्यांना दिली आहे. ज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे तेजस्वी रूप पाहायला मिळत आहे.
"हा जयघोष आहे हिंदवी स्वराज्याचा!
'जय शिवराय'
आत्ताच आपलं तिकीट बुक करा! (U/A 16+) (मराठी आणि हिंदी)
‘हिंदवी स्वराज्याचे संस्थापक’
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित ‘राजा शिवाजी’
१ मे २०२६ पासून चित्रपटगृहात प्रदर्शित!"
'राजा शिवाजी' चित्रपटात रितेश देशमुख, जिनिलिया, संजय दत्त, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते, विद्या बालन ही तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. चित्रपटात रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत, जिनिलीया देशमुख सईबाईंच्या भूमिकेत झळकणार आहे. महेश मांजरेकर शहाजीराजे भोसले यांची भूमिका साकारणार आहे. तर राजमाता जिजाऊंच्या भूमिकेत अभिनेत्री भाग्यश्री दिसणार आहेत. अभिषेक बच्चन संभाजीराजे शहाजीराजे भोसले यांच्या भूमिकेत झळकताना दिसेल.
'राजा शिवाजी' हा भव्य चित्रपट १ मे २०२६ रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. हा चित्रपट मराठी, हिंदी आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.