Riteish Deshmukh - Raja Shivaji : सैराटमधील प्रसिद्ध अभिनेत्याने रितेश भाऊंसोबत फोटो केला शेअर, 'राजा शिवाजी' मध्ये 'या' महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार

Raja Shivaji Movie Update : रितेश भाऊंच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. सैराट फेम मराठी अभिनेताही 'राजा शिवाजी' चित्रपटात झळकणार आहे.
Raja Shivaji Movie Update
Riteish Deshmukh - Raja Shivajisaam tv
Published On
Summary

'राजा शिवाजी' १ मे रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

रितेश देशमुख चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत झळकणार.

सैराट फेम मराठी अभिनेत्याने रितेश भाऊंसोबत एक फोटो शेअर केला आहे.

रितेश देशमुखचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'राजा शिवाजी' १ मे रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. सर्वत्र आता 'राजा शिवाजी'चा बोलबाला पाहायला मिळत आहे. या चित्रपटात तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. बॉलिवूडसोबतच मराठीतील प्रसिद्ध कलाकारही 'राजा शिवाजी' मध्ये झळकले आहेत. अशात आता 'राजा शिवाजी' चित्रपटासंबंधित आणखी एक मोठे अपडेट समोर आली आहे. महेश मांजरेकर, सिद्धार्थ जाधव, सचिन खेडेकर, जितेंद्र जोशी नंतर आणखी एक मराठी अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार आहे.

प्रसिद्ध मराठी अभिनेते सुरेश विश्वकर्मा देखील रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटात झळकणार आहेत. सुरेश विश्वकर्मा हे 'सैराट' चित्रपटात झळकले. यातून अभिनेत्याला खूप लोकप्रियता मिळाली. 'सैराट'मध्ये सुरेश विश्वकर्मा यांनी आर्चीचे वडीलांची भूमिका साकारली होती. त्यांनी रितेश भाऊंसोबत खास फोटो शेअर करून ही आनंदाची बातमी दिली आहे. तसेस पोस्टमध्ये त्यांनी स्वतःच्या लूकमधील फोटोही शेअर केले आहेत. अभिनेते सुरेश विश्वकर्मा हे 'राजा शिवाजी' चित्रपटात चंद्रराव मोरे यांच्या भूमिकेत झळकणार आहेत.

सुरेश विश्वकर्मा यांची पोस्ट

"१ मे पासून भारतभर प्रदर्शित होणाऱ्या 'राजा शिवाजी' या भव्यपटात चंद्रराव मोरेच्या भूमिकेत...

रितेश विलासराव देशमुख या अतिशय संस्कारी आणि विनम्र अभिनेता-दिग्दर्शकाबरोबर काम करण्याचा अविस्मरणीय अनुभव..."

अभिनेते सुरेश यांच्या पोस्टवर चाहते कमेंट्स आणि शुभेच्छांचा वर्षाव करत आहे. सुरेश विश्वकर्मा यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'मुळशी पॅटर्न', 'गोंधळ', 'रेगे', 'गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा' अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. तसेच त्यांनी मालिका आणि नाटक विश्व देखील गाजवले आहे.

'राजा शिवाजी' स्टार कास्ट

'राजा शिवाजी' चित्रपटात रितेश देशमुख, जिनिलिया, संजय दत्त, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते, विद्या बालन हे दिग्गज कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटात जिनिलीया देशमुख सईबाईंच्या भूमिकेत झळकणार आहे. महेश मांजरेकर शहाजीराजे भोसले यांची भूमिका साकारणार आहे. तर राजमाता जिजाऊंच्या भूमिकेत अभिनेत्री भाग्यश्री दिसणार आहेत. अभिषेक बच्चन संभाजीराजे शहाजीराजे भोसले यांच्या भूमिकेत झळकताना दिसेल. हा चित्रपट मराठी, हिंदी आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Raja Shivaji Movie Update
Famous Singer Death : प्रसिद्ध गायकाचे कार अपघातात निधन; २४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, संगीत विश्वावर शोककळा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com