Surabhi Jayashree Jagdish
यंदाच्या सिझनमध्ये मुंबई इंडियन्सची कामगिरी फारच वाईट सुरू आहे. बुधवारी झालेल्या सामन्यात मुंबईने २४० पेक्षा अधिक रन्स करूनही त्यांच्या पदरी पराभवच आला.
आता प्रश्न असा आहे की, मुंबई इंडियन्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडली आहे का. तर याचं उत्तर नाही असून मुंबईला अजूनही प्लेऑफ गाठण्याची संधी आहे. हे समीकरण कसं आहे ते पाहूयात.
समीकरणानुसार, मुंबईने आठपैकी केवळ दोन सामने जिंकले आहेत. त्यांना ६ मध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. म्हणजेच टीमचे केवळ चार गुण असून टीम पॉईंट्स टेबलमध्ये ९ व्या क्रमांकावर आहे.Mumbai Indians performance
मुंबईचे आता आणखी ६ सामने बाकी आहेत. म्हणजेच जर टीमने उरलेले ६ सामने जिंकले तर त्यांचे १२ पॉईंट्स होतील. चार पॉईंट्स आधीच असल्याने त्यांचे अखेरीस १६ पॉईंट्स होणार आहेत.
जर मुंबईचे १६ पॉईंट्स झाले तर ते प्लेऑफमध्ये जाण्यासाठी पुरेसे आहेत. मुंबईने ८ सामने गमावले आहेत, त्यामुळे पुढचे ६ सामने कसे जिंकणार हा प्रश्न समोर आहे.
मुंबईचा आता पुढील एकही सामना गमावला तर त्यांना १६ गुणांपर्यंत पोहोचणं शक्य होणार नाही. यावेळी ते १४ पॉईंट्सपर्यंत पोहोचू शकतील. अशावेळी समीकरण नेट रन रेटमध्ये फसू शकतं. त्यामुळे मुंबईला नेट रन रेटही सुधारावा लागणार आहे.
नेट रन रेटमध्ये केवळ मुंबईला मोठ्या फरकाने सामने जिंकून चालणार नाही, तर पंजाब किंग्स, आरसीबी आणि राजस्थान रॉयल्सच्या टीम्सने त्यांचे सर्व सामने जिंकावेत यासाठी प्रार्थना केली पाहिजे.