Indrajaal SAAM TV
मनोरंजन बातम्या

Indrajaal : 'इंद्रजाल'चा फर्स्ट लूक; गुप्त खजिन्याचा शोध लागणार? कोण-कोणते कलाकार झळकणार?

Indrajaal Movie First Look Poster : 'इंद्रजाल' चित्रपटाचा पहिला लूक पोस्टर समोर आला आहे. या चित्रपटात कोण-कोण झळकणार, जाणून घेऊयात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

'इंद्रजाल' चित्रपटाचा पहिला लूक पोस्टर रिलीज

गुप्त खजिन्याचा शोध लागणार

ब्रिटिशकालीन इतिहास-लोकसंस्कृतीवर आधारित चित्रपट

रहस्य, पौराणिक कथा आणि गुप्त खजिन्याचा शोध हा सर्व थरार तुम्हाला 'इंद्रजाल' या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. 'इंद्रजाल' चित्रपटाचा पहिला लूक पोस्टर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. भारताचा समृद्ध इतिहास आणि संस्कृतीशी जोडलेला 'इंद्रजाल' चित्रपट भारतीय पौराणिक कथांमधील निळावंतीशी संबंधित गूढ रहस्य आणि जंगलातील रोमांचक साहसावर आधारित आहे.

'शिवरत्न प्रॉडक्शन'ने नुकतीच 'इंद्रजाल' या त्यांच्या पहिल्या हिंदी चित्रपटाची घोषणा केली आहे. आता या चित्रपटाचे पहिले मोशन पोस्टर आणि फर्स्ट लूक समोर आला आहे, जे पाहून प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

'इंद्रजाल' हा सिनेमा सौ. सुचेता अजय निकम यांच्या 'शिवरत्न प्रॉडक्शन'ची पहिली निर्मिती आहे. तसेच अजय निकम आणि मंगेश वैती हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा दिग्दर्शक जागेश्वर ललिता ढोबळे यांनी सांभाळली आहे. जमिनीशी जोडलेले, भावपूर्ण आणि सामाजिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण कथा मांडण्यासाठी ओळखले जाणारे हे दिग्दर्शक 'इंद्रजाल'मधून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत.

'इंद्रजाल' स्टार कास्ट

'इंद्रजाल' चित्रपटात मुख्य भूमिकेत महेश निकम, शनाया त्रिपाठी, यशराज डिंबळे, किरण माने, कल्पना सारंग, नामदेव मुरकुटे हे कलाकार झळकले आहेत. तर दर्शना रसाळ, धीरज शर्मा, सत्यम छेत्री, राहुल कुलकर्णी, संजना देशमुख, कल्पेश जगताप, लक्ष्मी विभुते आणि योगेश दांगट हे सह कलाकार आहेत. 'इंद्रजाल' हा रहस्यमय चित्रपट 24 जुलैला रिलीज होणार आहे. चाहते चित्रपटाच्या ट्रेलरसाठी उत्सुक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime : मुंबई हादरली! १० वर्षाच्या मुलासमोर महिलेवर बलात्कार; गळ्यावर कोयता ठेवून तडीपार गुंडाचं भयंकर कृत्य

Ketan Agarwal Case: जीव घेणे सोपं झालं का? पुण्यातल केतन अग्रवाल हत्या प्रकरणावर प्रसिद्ध अभिनेत्री संतापली

Nandurbar : हृदयद्रावक! इकडे बहिणीचा जन्म आणि दुसरीकडे भावाचा मृत्यू; माऊलीच्या आक्रोशाने सातपुडा सुन्न

Maharashtra News Live Update: भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक आमने-सामने, जोरदार घोषणाबाजी

पावसाळ्यात दही खाल्ल्याने सर्दी-खोकला होतो का? Should You Eat Curd During Monsoon

SCROLL FOR NEXT