Marathi Serial : ४ वर्षांचा प्रवास अखेर संपणार; लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, चाहते नाराज

Marathi Serial Off Air : लोकप्रिय मराठी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार. मुख्य कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून याची माहिती दिली.
Marathi Serial Off Air
Marathi SerialSAAM TV
Published On
Summary

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका लवकरच संपणार

मालिकेच्या मुख्य कास्टने पोस्ट करून दिली माहिती

मालिका तब्बल ४ वर्षांनी प्रेक्षकांचा निरोप घेणार

'स्टार प्रवाह' वाहिनीवर सात नवीन मालिका आणि शो सुरू होत आहे. काही शो अलिकडेच सुरू झाले आहेत. नवीन मालिकांना प्रेक्षकांकडून भरपूर चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अशात मात्र आता 'स्टार प्रवाह' वहिनीवरील एक लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मालिकेची मुख्य अभिनेत्री आणि अभिनेता यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून चाहत्यांना ही बातमी दिली आहे.

'स्टार प्रवाह' वाहिनीवरील मराठी अभिनेता शशांक केतकर मुख्य भूमिकेत असलेली मालिका 'मुरांबा' लवकरच संपणार आहे. तब्बल चार वर्षांनी 'मुरांबा' मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार. या मालिकेत शशांक केतकरसोबत अभिनेत्री शिवानी मुंधेकर मुख्य भूमिकेत आहे. 'मुरांबा' ही मालिका फेब्रुवारी २०२२ मध्ये सुरू झाली होती. 'मुरांबा' मालिकेने काही दिवसांपूर्वीच १४०० भाग पूर्ण केले आहेत. यानिमित्ताने मालिकेच्या संपूर्ण टीमने सेलिब्रेशन केले.

'मुरांबा' मालिकेत शशांक केतकर अक्षयच्या भूमिकत झळकला तर शिवानीने रमाची भूमिका साकारली. दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूपच आवडली. अभिनेत्री शिवानी मुंधेकरने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली होती. ज्यात तिने रमाच्या लूकमधील एक फोटो शेअर केला होता आणि लिहिलं की, "वन लास्ट टाइम Being Rama" त्यानंतर अभिनेता शशांक केतकरने देखील एक स्टोरी शेअर केली आहे. ज्यात 'मुरांबा' मालिकेच्या शेवटच्या स्क्रिप्टचा फोटो शेअर केला आहे. तसेच अभिनेत्याने व्हिडीओच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

'मुरांबा' मालिका बंद होणार त्यामुळे चाहते नाराज झाले आहे. सोशल मीडियावरील पोस्टवर कमेंट करून आपली नाराजी ते व्यक्त करताना दिसत आहेत. 'मुरांबा' मालिका दुपारी प्रदर्शित व्हायची. या मालिकेत शशांक केतकर आणि शिवानी मुंधेकर यांच्यासोबतच सुलेखा तळवलकर, निशाणी बोरुले, अभिजीत चव्हाण, प्रतिमा कुलकर्णी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत होते.

Marathi Serial Off Air
Marathi Actress Wedding : शुभमंगल सावधान! प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, विवाह सोहळ्यातील खास VIDEO आला समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com