Surabhi Jayashree Jagdish
आवळा हा व्हिटॅमिन C चा उत्कृष्ट स्रोत आहे. शिवाय तो आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. तो चवीला आंबट-गोड असल्यामुळे खायलाही रुचकर लागतो.
आवळा अनेक प्रकारे खाल्ला जातो जसं की सलाड, भाजी किंवा चटणी. परंतु बहुतेक लोकांना आवळ्याचा मुरंबा खूप आवडतो. त्याची गोड आणि हलकी आंबट चव सर्वांना आवडते.
बाजारात आवळ्याचा मुरंबा आणि लोणचे सहज उपलब्ध असते. हे पदार्थ दीर्घकाळ टिकतात आणि खराब होत नाहीत. म्हणून अनेकजण ते तयारच विकत घेणं पसंत करतात.
तुम्ही घरच्या घरीही आवळ्याचा मुरंबा तयार करू शकता. घरी बनवलेला मुरंबा ताजा असतो. तो बनवण्याची पद्धतही खूप सोपी आहे.
सर्वप्रथम १ किलो ताजे आवळे स्वच्छ धुऊन घ्या. नंतर फोकच्या मदतीने प्रत्येक आवळ्यावर छोटी छिद्र करा. यामुळे साखरेचा पाक आतपर्यंत मुरू शकतो.
एका मोठ्या भांड्यात पाणी गरम करून त्यात आवळे टाका. त्यांना १० ते १५ मिनिटे उकळा जोपर्यंत ते मऊ होत नाहीत.
पाक तयार करण्यासाठी एका भांड्यात १ किलो साखर आणि १-२ कप पाणी घाला. साखर वितळल्यानंतर त्यात उकडलेले आवळे घालून मंद आचेवर ३०-४० मिनिटं शिजवा. पाक
घट्ट झाला आणि आवळे पारदर्शक दिसू लागले की थंड करून काचेच्या बरणीत भरू ठेवा.