Death News : तेजस्वी तारा हरपला; ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक अन् अभिनेत्याचे निधन, सिनेसृष्टी शोकसागरात

Famous Film Director-Actor Death : प्रसिद्ध ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेत्याचे निधन झाले. मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली.
Famous Film Director-Actor Death
Death NewsSAAM TV
Published On
Summary

ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेत्याचे निधन

वयाच्या ८४ व्या वर्षी अभिनेत्याने घेतला अखेरचा श्वास

मनोरंजन विश्वावर शोककळा

मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध ज्येष्ठ चित्रपट निर्माते आणि अभिनेते भारथिराजा / भारतीराजा(Bharathiraja) यांचे बुधवारी १० जून रोजी चेन्नईत निधन झाले. अभिनेत्याच्या निधनाने तमिळ चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अभिनेत्याने वयाच्या ८४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्याच्या अशा अचानक जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, निर्माते आणि अभिनेते भारथिराजा गेल्या काही महिन्यांपासून प्रकृतीच्या समस्यांशी झुंज देत होते. त्यांच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, भारथिराजा यांच्यावर वयोमानानुसार उद्भवणारे आजार आणि श्वसनाशी संबंधित समस्यांवर (श्वास घेण्याचा त्रास आणि फुफ्फुसाचा संसर्ग ) उपचार सुरू होते. मात्र अद्याप मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करणारे कोणतेही अधिकृत निवेदन समोर आले नाही.

Famous Film Director-Actor Death
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीला पतीकडून मारहाण, प्रकरण कोर्टात पोहोचले

गेल्या वर्षी श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना चेन्नईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी डॉक्टरांनी ते उपचारांना चांगला प्रतिसाद देत असल्याचे सांगितले असले तरी, त्यांची प्रकृती नाजूकच राहिली होती. अभिनेत्याच्या निधनाची बातमी समजताच कलाकार आणि चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यामातून भारथिराजा यांच्यावर श्रद्धांजली वाहिली आहे.

भारथिराजा यांची कारकीर्द

अभिनेते भारथिराजा यांचा जन्म १९४१ मध्ये झाला. त्यांचा पहिला चित्रपट '१६ वयथिनिले' (१९७७) हा तमिळ चित्रपटसृष्टीत खूप गाजला. किझाके पोगम रेल, सिगप्पू रोजक्कल, अलैगल ओइवाथिल्लई, काधल ओवियम आणि मुधल मारियाथाई हे दिग्दर्शक म्हणून त्यांच्या प्रसिद्ध चित्रपटांपैकी आहेत.

Famous Film Director-Actor Death
Bigg Boss 20 : सलमान खानचा 'बिग बॉस २०' कधी सुरू होणार? यंदा कोण-कोणते सेलिब्रिटी झळकणार? वाचा मोठी अपडेट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com