'बिग बॉस' फेम प्रसिद्ध अभिनेत्रीला नवऱ्याकडून मारहाण
अभिनेत्रीने FIR दाखल केला
अभिनेत्री लवकरच घेणार घटस्फोट
'बिग बॉस' फेम आणि लोकप्रिय हरियाणवी गायिका सपना चौधरीच्या घटस्फोटाच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू असताना तिने आता पती वीर साहूवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला असून दिल्ली न्यायालयाने मंगळवारी तिला अंतरिम संरक्षण (Interim Protection) दिले आहे. सुनावणीच्या पुढील तारखेपर्यंत तिच्या पतीला सपना चौधरीशी संपर्क साधण्यापासून किंवा त्यांच्या जवळ जाण्यापासून न्यायालयाने रोखले आहे.
पीटीआयच्या वृत्तानुसार, सपना चौधरीने महिला न्यायालयात धाव घेतली. तिने आरोप केला की, तिला पतीकडून मारहाण झाली असून सार्वजनिक ठिकाणी तिच्या नवऱ्याने गोंधळ घातला. तिने यापूर्वीच न्यायालयाला कळवले होते की, ती घर सोडून वेगळी राहत आहे आणि तिने पतीविरुद्ध घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली आहे.
न्यायिक दंडाधिकारी निधी सिंग या सपना चौधरी यांच्या वकिलांमार्फत दाखल केलेल्या अर्जावर सुनावणी करत होत्या. सपना यांनी आपल्या चित्रपटाचा आगामी प्रीमियर आणि वैयक्तिक सुरक्षिततेबाबतची भीती तसेच व्यावसायिक कामांत येऊ शकणारा अडथळा लक्षात घेऊन अंतरिम दिलासा देण्याची मागणी केली.
न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटल्याप्रमाणे, सपना चौधरीच्या पतीला पुढील तारखेपर्यंत सपना चौधरीशी कोणत्याही प्रकारे संपर्क साधण्यासाठी आणि तिच्याजवळ जाण्यापासून रोखण्यात आले आहे. तसेच, सपना चौधरीच्या घरी आणि कामाच्या ठिकाणी जाण्यास मनाई केली आहे. याचिका, प्रतिज्ञापत्र आणि कथित दुखापतींचे फोटो, इलेक्ट्रॉनिक पुराव्यांसह रेकॉर्डवर ठेवलेली कागदपत्रे यांवरून सपना चौधरीला अंतरिम आदेश जारी करण्यात आला.
न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी २५ जुलै रोजी निश्चित केली आहे. सपना चौधरी आणि वीर साहू यांनी २०२० मध्ये कोर्ट मॅरेज केले होते. चार वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर या जोडप्याने लग्नाचा निर्णय घेतला. सपना आणि वीर यांना दोन मुलं आहेत. पोरसचा जन्म २०२० मध्ये झाला, तर सपनाने २०२४ मध्ये आपल्या दुसऱ्या मुलाला, शाहबीरला जन्म दिला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.