

पुणे सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
जामीन फेटाळल्यामुळे त्यांना अटक होण्याची शक्यता वाढली आहे.
आक्षेपार्ह वक्तव्यामुळे हा गुन्हा दाखल झाला आहे.
ठाकरे सेनेचे नेते माजी नगरसेवक वसंत मोरे यांच्याविरोधात अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची आज कोर्टात सुनावणी झाली असून पुणे सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे त्यांच्या मानेवर अटकेची टांगती तलवार लटकली आहे.
काही दिवसापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये वसंत मोरे यांनी विश्वनाथ लहाडे यांचा उल्लेख करताना आक्षेपार्ह आणि बदनामीकारक वक्तव्य केलं होतं. त्यावरून त्यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुणे महानगरपालिकेत वसंत मोरे यांनी २५ फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत "लहाडे दारू पिला होता, त्याला बोलता येत नव्हतं. ओढ्यामध्ये उतरून गटारे साफ करत होता', असं वक्तव्य मोरे यांनी केलं होतं, असं फिर्यादीने सांगितले होतं.
दरम्यान वसंत मोरे यांचे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या वक्तव्यामुळे लहाडे यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचला आणि समाजातील स्थानावर परिणाम झाला असं फिर्यादींनी म्हटलं होते. या प्रकरणात वसंत मोरे यांनी अटकपूर्व जामीन अर्ज केला होता.
मात्र पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने अर्ज नाकारला. ॲड. आकाश साबळे सर, ॲड. कपिल शिवशरण यांनी जोरदार युक्तिवाद करत फिर्यादींच्या वतीने बाजू मांडली. या वेळी फिर्यादी अविनाश लहाडे आणि वंचित बहुजन आघाडीचे ओंकार कांबळे, अभिजीत बनसोडे, युवा आघाडीचे अक्षय कांबळे, विपुल सोनवणे आणि अनेक पदाधिकारी, आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.