'देऊळ बंद २' चित्रपट २१ मे ला रिलीज
'देऊळ बंद २' लवकरच गाठणार १०० कोटींचा टप्पा
'देऊळ बंद २' चे बजेट वसूल
प्रवीण तरडेंचा 'देऊळ बंद २' चित्रपट २०१५ साली रिलीज झालेल्या 'देऊळ बंद' चा सीक्वल आहे. 'देऊळ बंद २' लवकरच १०० कोटींचा टप्पा गाठणार आहे. हा चित्रपट २१ मे ला रिलीज झाला. चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशींनी स्वामींची भूमिका साकारली. चित्रपटात शेतकरी महिला स्वामींची परीक्षा घेताना दिसत आहे.
चित्रपटात प्रवीण तरडे, स्नेहल तरडे आणि मोहन जोशी यांच्यासोबत महेश मांजरेकर, प्रसाद ओक, मंगेश देसाई, देवेंद्र गायकवाड,रमेश परदेशी,ओम भूतकर, सुनील अभ्यंकर, संस्कृती बालगुडे, मुकुंद वसुले, अतुल कुदले, अनिरुद्ध दिंडोरकर आणि हिृषीकेश वांबुरकर हे कलाकार झळकले आहेत. चित्रपटाचे एकूण कलेक्शन जाणून घेऊयात.
Sacnilk च्या रिपोर्टनुसार, 'देऊळ बंद २' चित्रपटाने २० व्या दिवशी १,१२१ शोमधून १.१० कोटी रुपयांची नेट कमाई केली. यामुळे भारतातील एकूण ग्रॉस कमाई ७२.८९ कोटी रुपये आणि एकूण नेट कमाई ६२.०० कोटी रुपये इतकी झाली आहे. आता येणाऱ्या वीकेंडला चित्रपटाने भरपूर कमाई केली, तर 'देऊळ बंद २' लवकरच १०० कोटींचा टप्पा गाठेल.
दिवस १ - ३.०५ कोटी रुपये
दिवस २ -३.११ कोटी रुपये
दिवस ३ -५.२१ कोटी रुपये
दिवस ४ - ६. १० कोटी रुपये
दिवस ५ - ३. ७० कोटी रुपये
दिवस ६ - ३.३५ कोटी रुपये
दिवस ७ - ३.६० कोटी रुपये
दिवस ८ - ४.५५ कोटी रुपये
दिवस ९ - ३.१० कोटी रुपये
दिवस १० - ५ कोटी रुपये
दिवस ११ - ५.७५ कोटी रुपये
दिवस १२ - २.६० कोटी रुपये
दिवस १३ - २.३५ कोटी रुपये
दिवस १४ -१.८० कोटी रुपये
दिवस १५ -१.८० कोटी रुपये
दिवस १६ -१.४० कोटी रुपये
दिवस १७ - २.६० कोटी रुपये
दिवस १८ - ३.१५ कोटी रुपये
दिवस १९ - १. १५ कोटी रुपये
दिवस २० - १.१० कोटी रुपये
एकूण - ६२.०० कोटी रुपये
'देऊळ बंद २' नंतर प्रवीण तरडे 'मुळशी पॅटर्न २' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यांनी स्वतः जिममध्ये व्यायाम करतानाचा फोटो शेअर करून 'मुळशी पॅटर्न २' ची घोषणा केली. चित्रपटाचे पूर्ण नाव - 'मुळशी पॅटर्न – २ तुमच्या घराच्या भिंतीतील वाळूची गोष्ट!' असे आहे. या चित्रपटात प्रत्येकाच्या स्वप्नातलं घर साकारताना होणारी चढाओढ, मेहनत आपल्याला पाहायला मिळणार आहे. चाहते चित्रपटासाठी खूपच उत्सुक आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.