Deepika-Ranveer : रणवीर सिंहसोबत दीपिका पादुकोण पोहचली नवीन घरात; बाल्कनीत बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली, क्यूट VIDEO होतोय व्हायरल

Deepika Padukone - Ranveer Singh Video : बॉलिवूडचे पावर कपल दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंहचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात दीपिका पादुकोण बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे.
Deepika Padukone - Ranveer Singh Video
Deepika-RanveerSAAM TV
Published On
Summary

दीपिका- रणवीर नवीन घरात पोहचले.

बाल्कनीत बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचा दीपिकाचा व्हिडीओ व्हायरल

दीपिका- रणवीर लवकरच दुसऱ्यांदा आई-बाबा होणार

बॉलिवूडचे पावर कपल दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह लवकरच दुसऱ्यांदा आई-बाबा होणार आहेत. गेल्याकाही काळापासून रणवीर सिंह 'धुरंधर' आणि 'डॉन ३' चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. अशात दिपवीर एकत्र वेळ घालवताना स्पॉट झाले आहेत. दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंहचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात दोघे आपल्या नवीन घराच्या बाल्कनीत निवांत वेळ घालवताना आणि गप्पा मारताना दिसत आहेत.

सोमवारी संध्याकाळी दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह आपल्या नवीन घरात गेले. तेव्हा दोघे नवीन घराच्या बाल्कनीत दिसले. त्यांचे नवीन घर सी-फेसिंग ड्रीम होम हे बँडस्टँड, वांद्रे मुंबई येथे आहे. हे घर बनवण्यासाठी अंदाजे १०० कोटींहून अधिक रक्कम खर्च करण्यात आली आहे. प्रेग्नेंट दीपिका 'बेबी बंप'वर हात ठेवून रणवीरशी बाल्कनीत उभी राहून गप्पा मारताना दिसली.

मीडिया रिपोर्टनुसार, दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह आपल्या नवीन घराच्या इंटिरिअरच्या कामाची पाहणी करण्यासाठी आले होते. दीपिकाने पांढऱ्या रंगाचा सैलसर को-ऑर्ड सेट परिधान केला होता. रणवीरने लाल रंगाची कॅज्युअल टी-शर्ट आणि काळ्या रंगाची ट्रॅक पँट परिधान केली होती. त्यांच्या या व्हिडीओवर चाहते भरभरून प्रेमाचा आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहे. लवकरच दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह आपल्या नवीन घरात राहायला जातील.

दीपिका पादुकोणने 2018 मध्ये रणवीर सिंहसोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर 2024 मध्ये तिने गोंडस मुलीला जन्म दिला. जिचे नाव 'दुवा' असे आहे. एप्रिल महिन्यात लेक दुवासोबतचा एक फोटो शेअर करून दीपिका आणि रणवीरने दुसऱ्या प्रेग्नेंसीची गुडन्यूज चाहत्यांना दिली होती. दीपिका पादुकोण लवकरच शाहरुख खानसोबत 'किंग' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Deepika Padukone - Ranveer Singh Video
'तुंबाडची मंजुळा', 'बंदर', 'है जवानी तो इश्क होना है' मध्ये काटे की टक्कर; मराठी की हिंदी चित्रपट, तिकिट खिडकीवर कोणी मारली बाजी?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com