Dhurandhar 2 : २० दिवसांनंतरही दीपिका पादुकोण गप्प का? रणवीर सिंहच्या 'धुरंधर'वरून ट्रोल करणाऱ्यांना दिलं सडेतोड उत्तर

Deepika Padukone First Reaction On Dhurandhar 2 : दीपिका पादुकोणला गेल्या अनेक दिवसांपासून 'धुरंधर' चित्रपटामुळे ट्रोल केले जात होते. आता 'धुरंधर २' वर प्रतिक्रिया करत तिने ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिले.
Dhurandhar 2
Dhurandhar 2saam tv
Published On
Summary

'धुरंधर: द रिव्हेंज' चित्रपट 19 मार्च 2026 ला रिलीज झाला.

रणवीर सिंहच्या 'धुरंधर'वरून ट्रोल करणाऱ्यांना दीपिका पादुकोणने सडेतोड उत्तर दिले.

'धुरंधर २' च्या रिलीजनंतर सर्वत्र रणवीर सिंहचे कौतुक होत आहे.

रणवीर सिंहच्या 'धुरंधर: द रिव्हेंज' चा जगभरात बोलबाला पाहायला मिळत आहे. मात्र 'धुरंधर २'च्या घवघवीत यशानंतरही दीपिका पादुकोणची कोणतीही प्रतिक्रिया न आल्यामुळे ती चांगलीच चर्चेत आहे. अशात आता दीपिका पादुकोणने 'धुरंधर २'वर प्रतिक्रिया देऊन मौन सोडले आहे. दीपिका पादुकोण 'धुरंधर: द रिव्हेंज' च्या मुंबईतील स्क्रीनिंगलाही उपस्थित नव्हती.

Dhurandhar 2
Dhurandhar 2

दीपिकाने मौन सोडले

दीपिकाने सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका रीलच्या कमेंट सेक्शनमध्ये एका चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर दिले आहे. या रीलमध्ये तिला विचारण्यात आले होते की, ती मुद्दाम शांत होती की उगाचच जास्त चर्चा केली जात आहे. दीपिकाने यावर लिहिले, "मित्रांनो, उत्तर दुसरं आहे... मी 'धुरंधर २' तुमच्या सगळ्यांच्या खूप आधी पाहिला आहे... आता सांगा, विनोद कोणावर झाला?" दीपिकाने या रीलवर कमेंट करून सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

दीपिका पादुकोणने दिलेले हे उत्तर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चाहत्यांनी तिच्या बाजूने जोरदार समर्थन केले. Sacnilk च्या रिपोर्टनुसार, 'धुरंधर २' ने भारतीय बॉक्स ऑफिसवर १,०३३.३७ कोटी आणि जगभरात १,६४१.२१ कोटी कमावले आहेत. 'धुरंधर २'च्या कमाईत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. 'धुरंधर: द रिव्हेंज' चित्रपट 19 मार्च 2026 ला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'धुरंधर 2' चित्रपटाची कथा भारताचा गुप्तहेर असलेल्या आणि पूर्वी 'जसकीरत सिंह रंगी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हमझा अली माझारीच्या प्रवासाची आहे.

बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोड्यांपैकी एक म्हणजे रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण. त्यांनी 'बाजीराव मस्तानी', 'पद्मावत' आणि 'गोलियों की रासलीला राम-लीला' या चित्रपटात एकत्र काम केले आहे. दीपिका पदुकोणने 2024 मध्ये एका गोंडस मुलीला जन्म दिला. 'धुरंधर २' हा रणवीर सिंहच्या कारकिर्दीतील सर्वाम ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे.

Dhurandhar 2
Bollywood Actress : बॉलिवूड अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com