Bollywood Actress : बॉलिवूड अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Bollywood Actress Passing Of A Loved One : प्रसिद्ध अभिनेत्रीच्या जवळच्या व्यक्तीचे निधन झाले आहे. ज्यामुळे अभिनेत्रीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Bollywood Actress Passing Of A Loved One
Bollywood ActressSAAM TV
Published On
Summary

प्रसिद्ध अभिनेत्रीवर दुःखाचा डोंगर कोसळला.

अभिनेत्रीच्या जवळच्या व्यक्तीचे निधन झाले.

व्यक्तीचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

मनोरंजन विश्वातून आणखी एक दुःखद बातमी समोर आली आहे. गेले काही दिवस मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारांचे आणि त्यांच्या जवळच्या व्यक्तींचे निधन झाले आहे. 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या टीव्ही मालिकेतून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री दिशा वकानीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. दिशा वकानीचे वडील ज्येष्ठ अभिनेते भीम वकानी यांचे निधन झाले. त्यांनी बॉलिवूडच्या अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केले होते. त्यांनी आमिर खानच्या 'लगान' चित्रपटात एक छोटी भूमिका साकारली होती.

Shibani Dandekar
Shibani Dandekarinstagram

दिशा वकानीनंतर प्रसिद्ध मराठी अभिनेते शेखर फडके यांच्या वडीलांचे म्हणजेच विजयकुमार फडके यांचे निधन झाले आहे. वयाच्या 76 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विजयकुमार फडके यांनी त्यांच्या वाढदिवशीच अखेरचा श्वास घेतला आहे. सध्या शेखर फडके 'तू ही रे माझा मितवा' या मराठी मालिकेत दिसत आहे. अशात आता बॉलिवूडमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्रीने आपली जवळची व्यक्ती गमावली आहे.

प्रसिद्ध अभिनेत्रीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. viralbhayani च्या वृत्तानुसार, अभिनेता फरहान अख्तरची (Farhan Akhtar) बायको, अभिनेत्री शिवांगी दांडेकर (Shibani Dandekar) हिच्या ड्रायव्हरचे निधन झाले आहे. शिवांगीच्या ड्रायव्हरचे नाव अब्दुल अझीझ (Driver Abdul Aziz) असे होते. त्यांनी जवळपास दोन दशके या कुटुंबासोबत काम केले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने ड्रायव्हरने अखेरचा श्वास घेतला. अब्दुल अझीझ हे प्रामाणिक आणि निष्ठावान ड्रायव्हर होते. एप्रिल २०२६ मध्ये आपले काम करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला.

ड्रायव्हरच्या अशा अचानक जाण्याने शिवांगी दांडेकर आणि ड्रायव्हरच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नेटकऱ्यांनी ड्रायव्हरवर श्रद्धांजली वाहिली आहे. शिवांगी दांडेकर ही प्रसिद्ध गायिका, मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तिने 'रॉय', 'सुलतान' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. शिवांगीने 2022 मध्ये अभिनेता-दिग्दर्शक फरहान अख्तरसोबत लग्नगाठ बांधली.

Bollywood Actress Passing Of A Loved One
Dhurandhar 2 Collection : रणवीर सिंह अन् अल्लू अर्जुन यांच्यात कांटे की टक्कर; 'धुरंधर २' नंबर १ पासून काही पावले दूर, 'पुष्पा २'लाही पछाडणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com