Karishma Tanna: प्रसिद्ध अभिनेत्री वयाच्या ४२ व्या वर्षी आई होणार; लग्नाच्या ४ वर्षांनंतर दिली गुड न्यूज

Karishma Tanna: अभिनेत्री करिश्मा तन्नाने लग्नाच्या चार वर्षांनंतर गोड न्यूज दिली आहो. सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करुन ही गोड बातमी चाहत्यांसह शेअर केली आहे.
Karishma Tanna
Karishma TannaSaam tv
Published On

Karishma Tanna: टीव्ही आणि बॉलिवूड क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री करिश्मा तन्नाने चाहत्यांसाठी आनंदाची बातमी शेअर केली आहे. लग्नाच्या चार वर्षांनंतर वयाच्या ४२ व्या वर्षी करिश्मा तन्ना गरोदर असून ती लवकरच आई होणार आहे. तिच्या या घोषणेमुळे चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

करिश्माने २०२२ साली बिझनेसमॅन वरुण बंगेरा याच्याशी लग्न केले होते. लग्नानंतर आता त्यांच्या आयुष्यात एक नवा टप्पा सुरू होत असून, ते दोघेही लवकरच आई-बाबा होणार आहेत. तिला ऑगस्ट महिन्यात बाळ होणार आहे. करिश्माने ही गोड बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे.

करिश्मा तन्नाने सोमवारी Instagram अकाउंटवर एक खास पोस्ट शेअर करत ही गोड बातमी जाहीर केली. तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये करिश्मा आणि वरुण ‘Mom’ आणि ‘Dad’ अशा टोप्या घालून कॅमेऱ्यासमोर पोझ देताना दिसत आहेत. यासोबतच बाळाच्या छोट्यासे बुट असलेले फोटो देखील त्यांनी पोस्ट केले. ज्यामुळे या क्षणाची गोडी आणखी वाढली आहे.

या पोस्टच्या कॅप्शनमध्ये करिश्माने लिहिले, “एक छोटासा चमत्कार, आमची सर्वात मोठी भेट ऑगस्ट २०२६.” यावरून ती ऑगस्ट महिन्यात आपल्या पहिल्या बाळाचे स्वागत करणार असल्याचे तिने सांगितले आहे.

सेलिब्रिटींकडून अभिनंदनाचा वर्षाव

करिश्मा तन्नाच्या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे. अनेक सेलिब्रिटींनीही तिला शुभेच्छा दिल्या आहेत. खुशी कपूर, जस्मिन भसीन, भूमी पेडणेकर आणि दिलजीत कौर यांसारख्या टीव्ही आणि बॉलिवूड क्षेत्रातील कलाकारांनी करिश्मा आणि वरुण यांना आपल्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com