Deool Band 2 Collection : श्री स्वामी समर्थ! प्रवीण तरडेंचा बॉक्स ऑफिसवर जलवा; 'देऊळ बंद २' नं केली बक्कळ कमाई, कलेक्शन एकदा वाचाच

Pravin Tarde - Deool Band 2- Box Office Collection Day 19 : जगभरात प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद २' चा डंका पाहायला मिळत आहे. चित्रपटाने तिसऱ्या सोमवारी किती कोटी कमावले जाणून घेऊयात.
Pravin Tarde - Deool Band 2- Box Office Collection Day 19
Deool Band 2 Collectionsaam tv
Published On
Summary

स्वामी भक्तांनी 'देऊळ बंद २' पाहायला गर्दी केली

'देऊळ बंद २' सिनेमा २१ मे ला चित्रपटगृहात प्रदर्शित

प्रवीण तरडे आणि स्नेहल तरडेची जोडी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतेय

बॉक्स ऑफिसवर सध्या मराठी, हिंदी आणि साउथ तिन्ही चित्रपटांमध्ये तगडी टक्कर पाहायला मिळत आहे. मराठीत 'देऊळ बंद 2', 'तुंबाडची मंजुळा' सिनेमे रिलीज झाले आहेत. साऊथमध्ये राम चरणचा 'पेड्डी' चित्रपट प्रदर्शित झाला आहे. तर ५ जून २०२६ ला वरुण धवनचा 'है जवानी तो इश्क होना है' आणि बॉबी देओलचा 'बंदर' हे बॉलिवूडचे चित्रपट रिलीज झाले आहेत. या सर्वातही 'देऊळ बंद 2' आपली बक्कळ कमाई करताना दिसत आहे. 'देऊळ बंद 2' चित्रपट २१ मे ला रिलीज झाला असून थिएटरमध्ये धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाचे आतापर्यंतचे कलेक्शन जाणून घेऊयात.

'देऊळ बंद २' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस १९

तिसऱ्या आठवड्यातही 'देऊळ बंद २' थिएटर गाजवताना दिसत आहे. Sacnilk च्या रिपोर्टनुसार, प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद २' चित्रपटाने १९ व्या दिवशी म्हणजे तिसऱ्या सोमवारी १,१३७ शोमधून १.१५ कोटी रुपयांची नेट कमाई केली आहे. यामुळे भारतातील एकूण ग्रॉस कलेक्शन ७१.६२ कोटी रुपये आणि नेट कलेक्शन ६०.९० कोटी रुपये इतके झाले आहे. तिसऱ्या चौथ्या वीकेंडला देखील चित्रपटाने बक्कळ कमाई केली तर 'देऊळ बंद २' सिनेमा १०० कोटींचा टप्पा पार करेल.

  • दिवस १ - ३.०५ कोटी रुपये

  • दिवस २ -३.११ कोटी रुपये

  • दिवस ३ -५.२१ कोटी रुपये

  • दिवस ४ - ६. १० कोटी रुपये

  • दिवस ५ - ३. ७० कोटी रुपये

  • दिवस ६ - ३.३५ कोटी रुपये

  • दिवस ७ - ३.६० कोटी रुपये

  • दिवस ८ - ४.५५ कोटी रुपये

  • दिवस ९ - ३.१० कोटी रुपये

  • दिवस १० - ५ कोटी रुपये

  • दिवस ११ - ५.७५ कोटी रुपये

  • दिवस १२ - २.६० कोटी रुपये

  • दिवस १३ - २.३५ कोटी रुपये

  • दिवस १४ -१.८० कोटी रुपये

  • दिवस १५ -१.८० कोटी रुपये

  • दिवस १६ -१.४० कोटी रुपये

  • दिवस १७ - २.६० कोटी रुपये

  • दिवस १८ - ३.१५ कोटी रुपये

  • दिवस १९ - १. १५ कोटी रुपये

  • एकूण - ६०.९० कोटी रुपये

'देऊळ बंद 2' मधून स्वामी भक्ती, स्वामी चमत्कार, शेती आणि शेतकऱ्यांचे जीवन यांची अनोखी सांगड पाहायला मिळत आहे. चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी स्वामींच्या भूमिकेत झळकले आहेत. तर स्नेहल तरडेने शेतकऱ्यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या शेवटी गश्मीर महाजनी येतो आणि 'देऊळ बंद ३' ची घोषणा होते. चाहते प्रवीण तरडेंच्या आगामी चित्रपटासाठी खूपच उत्सुक आहेत.

Pravin Tarde - Deool Band 2- Box Office Collection Day 19
Famous Actress : दिग्दर्शकाचं किळसवाणं कृत्य; प्रसिद्ध अभिनेत्रीला चुकीच्या ठिकाणी स्पर्श, घाबरून बॉलिवूड इंडस्ट्री सोडली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com