Surabhi Jayashree Jagdish
राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये असलेले रामबाग पॅलेस हे देशातील सर्वात आलिशान हॉटेल्सपैकी एक मानले जाते. याठिकाणी राहण्यासाठी एका रात्रीचं भाडं साधारण ६ ते १० लाख रुपयांपर्यंत जातं. राजेशाही वास्तुकला आणि शाही सेवा यासाठी हे हॉटेल प्रसिद्ध आहे.
‘झीलों का शहर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उदयपूरमध्ये हे आलिशान हॉटेल आहे. येथे एका रात्रीसाठी साधारण ७ ते १२ लाख रुपये खर्च करावे लागतात. सुंदर तलाव, भव्य सजावट आणि शांत वातावरणामुळे पर्यटक येथे आकर्षित होतात.
पिछोला तलावाच्या मध्यभागी वसलेले ताज लेक पॅलेस जगातील सर्वात रोमँटिक हॉटेल्समध्ये गणले जाते. इथलं ‘महाराजा सुइट’चे एका रात्रीचे भाडे ५ ते ८ लाख रुपयांपर्यंत आहे. तलावाच्या मधोमध असलेले हे हॉटेल पर्यटकांना खास अनुभव देते.
पिछोला तलावाच्या किनाऱ्यावर असलेले द लीला पॅलेस आपल्या भव्यतेसाठी प्रसिद्ध आहे. येथे एका रात्रीसाठी साधारण ६ ते ९ लाख रुपये मोजावे लागतात. राजेशाही सुविधा आणि अप्रतिम दृश्यांमुळे हे हॉटेल खास ठरते.
हैदराबादमधील ताज फलकनुमा पॅलेसला ‘आसमान का आईना’ असेही म्हटले जाते. या आलिशान हॉटेलमध्ये राहण्यासाठी ७ ते १० लाख रुपये प्रति रात्र खर्च येतो. नवाबी थाट आणि ऐतिहासिक वास्तू यामुळे हे हॉटेल पर्यटकांच्या पसंतीस उतरते.
राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यातील उम्मेद भवन पॅलेस पूर्वी एक राजवाडा होता, जो आता आलिशान हॉटेलमध्ये बदलण्यात आला आहे. हे हॉटेल देशातील सर्वात महागड्या हॉटेल्समध्ये गणले जाते. राजेशाही अनुभव घेण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक येथे येतात.
उत्तर प्रदेशातील आग्र्यामध्ये असलेले ओबेरॉय अमरविलास हे जगातील टॉप ५० हॉटेल्समध्ये समाविष्ट आहे. या हॉटेलमधून ताजमहालाचे थेट दर्शन होते, ही त्याची खासियत आहे. आलिशान सुविधा आणि सुंदर दृश्यांमुळे हे भारतातील महागड्या हॉटेल्सपैकी एक मानले जाते.