'देऊळ बंद 2' चित्रपट २१ मे रिलीज
'देऊळ बंद 2' चित्रपटाची जगभरात बक्कळ कमाई
'देऊळ बंद 2' चा मराठीत सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत समावेश
प्रवीण तरडेंचा 'देऊळ बंद 2' चित्रपट पाहण्यासाठी स्वामी भक्त थिएटरमध्ये गर्दी करताना पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने १६ दिवसात जगभरात कोटींचा व्यवसाय केला आहे. तसेच मराठीत सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाच्या यादीत आपले नाव कमावले आहे. 'देऊळ बंद 2' चित्रपट २१ मे (गुरुवारी) रिलीज झाला आहे. चित्रपटातील गाणी सोशल मीडियावर प्रचंड गाजत आहे. चित्रपटाने तिसऱ्या शुक्रवारी किती कमावले, जाणून घेऊयात.
Sacnilk च्या रिपोर्टनुसार, 'देऊळ बंद २' चित्रपटाने १६ दिवशी म्हणजे तिसऱ्या शुक्रवारी १,२५१ शोमधून १.४० कोटी रुपयांची नेट कमाई केली. यामुळे भारतातील एकूण ग्रॉस कमाई ६३.४९ कोटी रुपये आणि एकूण नेट कमाई ५४.०० कोटी रुपये इतकी झाली आहे. दिग्दर्शक प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद २' चित्रपटाने जगभरात 65 कोटींहून अधिक कमाई केली आहे. आता तिसऱ्या वीकेंडला चित्रपट किती कोटी कमावतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दिवस १ - ३.०५ कोटी रुपये
दिवस २ -३.११ कोटी रुपये
दिवस ३ -५.२१ कोटी रुपये
दिवस ४ - ६. १० कोटी रुपये
दिवस ५ - ३. ७० कोटी रुपये
दिवस ६ - ३.३५ कोटी रुपये
दिवस ७ - ३.६० कोटी रुपये
दिवस ८ - ४.५५ कोटी रुपये
दिवस ९ - ३.१० कोटी रुपये
दिवस १० - ५ कोटी रुपये
दिवस ११ - ५.७५ कोटी रुपये
दिवस १२ - २.६० कोटी रुपये
दिवस १३ - २.३५ कोटी रुपये
दिवस १४ -१.८० कोटी रुपये
दिवस १५ -१.८० कोटी रुपये
दिवस १६ -१.४० कोटी रुपये
एकूण - ५४.०० कोटी रुपये
राजा शिवाजी (2026): ₹114.8 कोटी
सैराट (2016): ₹110 कोटी
बाईपण भारी देवा (2023): ₹92 कोटी
देऊळ बंद 2 (2026): ₹65 कोटी
वेड (2022): ₹75 कोटी
'देऊळ बंद २' चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशींनी स्वामींची भूमिका साकारली. तर अभिनेत्री स्नेहल तरडे शेतकरी महिलेच्या भूमिकेत झळकली. तसेच चित्रपटात महेश मांजरेकर, प्रसाद ओक, मंगेश देसाई, देवेंद्र गायकवाड,रमेश परदेशी,ओम भूतकर, सुनील अभ्यंकर, संस्कृती बालगुडे, मुकुंद वसुले, अतुल कुदले, अनिरुद्ध दिंडोरकर आणि हिृषीकेश वांबुरकर हे कलाकार झळकले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.