Shruti Vilas Kadam
काव्या आणि ध्रुव या लिव्ह-इन कपलच्या आयुष्यातील छोट्या-छोट्या क्षणांवर आधारित ही लिटिल थिंग्स सीरिज आधुनिक नातेसंबंधांचे वास्तववादी चित्रण करते.
दिल्लीतील भव्य लग्नसमारंभांच्या पार्श्वभूमीवर नातेसंबंध, सामाजिक वास्तव आणि मानवी भावनांचा वेध घेणारी ही मेड इन हेवन लोकप्रिय सीरिज प्रेक्षकांना खिळवून ठेवते.
प्रेम, कुटुंब आणि लग्नाच्या दबावामध्ये अडकलेल्या रियाची कथा या हाफ लव्ह हाफ अरेंज्ड सीरिजमध्ये पाहायला मिळते. रोमँटिक आणि कौटुंबिक भावनांचा सुंदर संगम यात आहे.
अपूर्ण प्रेम, विरह आणि पुन्हा भेटणाऱ्या दोन व्यक्तींची भावनिक कथा या ब्रोकन बट ब्युटीफुल 3 सीरिजमध्ये उलगडते. प्रेमकथा आवडणाऱ्यांसाठी हा उत्तम पर्याय आहे.
ब्रेकअपनंतरही एकमेकांच्या आयुष्यात राहणाऱ्या कपलची कथा या मायनस वन सीरिजमध्ये दाखवण्यात आली आहे. नात्यातील गुंतागुंत आणि भावना प्रभावीपणे मांडल्या आहेत.
मुंबईच्या पार्श्वभूमीवर विविध प्रकारच्या प्रेमकथा सांगणारी ही मॉडर्न लव्ह मुंबई अँथॉलॉजी सीरिज प्रेमाचे अनेक रंग दाखवते.
वैवाहिक आयुष्यातील चढ-उतार, गैरसमज आणि प्रेम यांचा सुंदर प्रवास दाखवणारी ही बारिश सीरिज कपल्ससाठी खास ठरू शकते.