Shruti Vilas Kadam
एक चमचा अॅलोवेरा जेलमध्ये 4-5 थेंब बदाम तेल मिसळा. हे मिश्रण स्वच्छ चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करत लावा आणि रात्रभर तसेच ठेवा.
बदाम तेलातील व्हिटॅमिन ई आणि अॅलोवेरा जेलमधील हायड्रेटिंग गुणधर्म त्वचेला आवश्यक ओलावा देतात. त्यामुळे त्वचा मऊ, नितळ आणि तजेलदार दिसते.
या दोन्ही घटकांच्या मिश्रणामुळे त्वचेचा कोरडेपणा कमी होतो आणि चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो दिसून येतो.
बदाम तेलातील पोषक घटक आणि अॅलोवेराचे त्वचा पुनरुत्पादन गुणधर्म हलके डाग व पिग्मेंटेशन कमी करण्यास मदत करू शकतात.
अॅलोवेरा जेलमध्ये दाहशामक गुणधर्म असतात. त्यामुळे सूर्यप्रकाशामुळे किंवा संवेदनशील त्वचेमुळे होणारी जळजळ शांत करण्यास मदत होते.
व्हिटॅमिन ई समृद्ध बदाम तेल त्वचेची लवचिकता टिकवून ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे वाढत्या वयाची चिन्हे कमी दिसू शकतात.
संवेदनशील किंवा तेलकट त्वचा असल्यास प्रथम पॅच टेस्ट करा. कोणतीही अॅलर्जी, खाज किंवा जळजळ जाणवल्यास वापर त्वरित थांबवा आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्या.