

PM किसान योजनेबाबत अपडेट
लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १८ जून रोजी २०० जमा होणार असल्याची चर्चा
व्हायरल मेसेजमागचं सत्य पडताळणीत उघड
PM किसान योजनेबाबत महत्त्वाची अपडेट हाती आली आहे. पीएम किसान योजनेचा आता २३ वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. या हप्त्याची शेतकऱ्यांना प्रतिक्षा आहे. योजनेच्या २३ व्या हप्त्याबाबत महत्त्वाची अपडेट हाती आली आहे.
केंद्र सरकारने १३ मार्च २०२६ रोजी योजनेचे २२ वा हप्ता दिला होता. या योजनेमार्फत थेट २००० रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर केले जातात. योजनेचा २२ वा हप्ता खात्यात जमा होऊन तीन महिने झाल्यानंतरही अद्याप २३ वा हप्ता खात्यात जमा झालेला नाही.
सध्या सोशल मीडियावर १८ जून रोजी योजनेचा २३ वा हप्ता खात्यात जमा होणार असल्याचा दावा केला जात आहे. या योजनेचा हप्ता येत्या १८ जून रोजी खात्यात जमा होणार का, याविषयी पडताळणी केली, त्यावेळी महत्वाची माहिती हाती आली.
केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने अद्याप योजनेच्या २३ व्या हप्त्याविषयी अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे १८ जून रोजी योजनेचा २३ वा हप्ता बँक खात्यात जमा होणार, याला कोणताही दुजोरा मिळालेला नाही.
तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२४ साली पीएम किसान योजनेचा १७ हप्ता हा १८ जून रोजी जारी केला होता. त्यावेळी ९ कोटी शेतकर्यांच्या खात्यात २०००० कोटींहून अधिक पैसे जमा झाले. त्यामुळे या योजनेचा २३ वा हप्ता येत्या १८ जून रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. सरकार पीएम किसान योजनेच्या हप्त्याची अधिकृत तारीख सांगत नाही, तोपर्यंत सोशल मीडियावर हप्त्याच्या तारखेविषयी एकच चर्चा सुरू राहते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.