

पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्वाती बातमी
पीएम किसान योजनेचा हप्ता कधी येणार
पंतप्रधानच यंदा हप्ता घोषित करणार का?
शेतकऱ्यांच्या खात्यात किती पैसे येणार?
शेतकऱ्यांसाठी भारतात अनेक योजना राबवल्या जातात. त्यामध्ये शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते. सध्या पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ शेतकरी घेत आहेत. त्यामध्ये शेतकऱ्यांना वर्षभरात ६००० रुपये दिले जातात. आता योजनेची मोठी अपडेट समोर आली आहे.
तुम्हाला माहितीये का की, हा हप्ता खात्यात कधी वितरित केला जातो? किंवा पंतप्रधानच दरवेळी प्रमाणे हा हप्ता खात्यात जमा करणार का? पुढे याबद्दलची थोडक्यात माहिती जाणून घेऊयात. तुम्ही सुद्धा या योजनेचा लाभ घेत असाल तर ही माहिती नक्की वाचा.
शेतकऱ्यांना पीएम किसान योजने अंतर्गत एका वर्षात ६००० रुपयांचा हप्ता दिला जातो. म्हणजेच ४ महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपये जमा होतात. हे तीन हप्ते एप्रिल पासून ते जुलै या महिन्यादरम्यान येतात. तर पुढचा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि शेवटचा डिसेंबर ते मार्च अशा पद्धतीत दिला जातो.
आत्तापर्यंत २२ हप्ते शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर पाठवण्यात आले आहेत. तर २२ वा हा मार्चमध्ये जमा केला होता. म्हणजेच पुढचा हप्ता २३वा हप्ता जून महिन्यात खात्यात जमा होईल. असा अंदाज आहे.
पीएम किसान योजनेचा हप्ता घोषित करण्यासाठी एका कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. वेगवेगळ्या देशातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये हप्ता जमा करण्याच्या वेळेस कार्यक्रम ठेवला जातो. तर मागील २२ वा हप्ता हा गुवाहाटीत घोषित केला होता. हप्त्याची रक्कम पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करतात. याचाच अंदाज घेऊन २३ वा हप्ता सुद्धआ पंतप्रधान मोदीच जाहीर करतील. पण या कार्यक्रमाविषयीची अधिकृत माहिती अजुन समोर आलेली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.