Shreya Maskar
पानशेत धरण, ज्याला तानाजीसागर धरण म्हणूनही ओळखले जाते. पानशेत धरण पुण्याच्या नैऋत्येस सुमारे ५० किमी अंतरावर आणि मुंबईपासून अंदाजे १८५ किमी अंतरावर आंबी नदीवर वसलेले आहे.
पानशेत धरण सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेले असल्यामुळे जलक्रीडा, निसर्गरम्य ड्राइव्ह आणि पावसाळ्यातील हिरव्यागार दृश्यांसाठी अत्यंत लोकप्रिय आहे.
पानशेत धरणाला भेट दिल्यावर तुम्हाला कयाकिंग, बोटिंग, बनाना बोट राईड आणि वॉटर स्कूटरिंग यांसारख्या रोमांचक वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेता येईल.
पानशेत धरणाजवळील परिसरात टेंट कॅम्पिंग, बॉनफायर आणि रात्रीच्या वेळी ताऱ्यांचे निरीक्षण (स्टारगेझिंग) करण्याची उत्तम सोय आहे. मित्रांसोबत बेस्ट वीकेंड प्लान करत असाल तर येथे नक्की जा.
तुम्ही मुंबई ते पुणे बाय रोड देखील जाऊ शकता. तसेच पुणे रेल्वे स्टेशनला उतरून पुढे रिक्षाने तुम्ही पानशेत धरणाजवळ पोहचला.
पावसाळ्यात निसर्गरम्य ठिकाणी तुम्हाला फोटोशूट करायचे असेल तर पानशेत धरण बेस्ट लोकेशन आहे. सकाळी येथे धुक्याची चादर पाहायला मिळते. तसेच पक्षांचा किलबिलाट ऐकू येतो.
पानशेत धरण आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये पावसाळ्यात अनेक लहान-मोठे धबधबे वाहतात. उदा. वरसगाव धबधबा, बग्गू धबधबा
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.