Bigg Boss 20 : सलमान खानचा 'बिग बॉस २०' कधी सुरू होणार? यंदा कोण-कोणते सेलिब्रिटी झळकणार? वाचा मोठी अपडेट

Bigg Boss 20 Salman Khan Show : सलमान खानच्या 'बिग बॉस २०' चे मोठे अपडेट समोर आले आहे. शो ची रिलीज डेट आणि स्पर्धकांची नावे जाणून घेऊयात.
Bigg Boss 20 Salman Khan Show
Bigg Boss 20 SAAM TV
Published On
Summary

हिंदी 'बिग बॉस २०' लवकरच सुरू होणार

सलमान खान करणार 'बिग बॉस २०' चं होस्टिंग

'बिग बॉस २०' मध्ये टिव्हीचे प्रसिद्ध कलाकार झळकणार

रितेश भाऊंचे 'बिग बॉस मराठी ६' संपल्यानंतर हिंदी 'बिग बॉस सीझन २०' ची चर्चा सोशल मीडियावर रंगली. 'बिग बॉस सीझन २०' कधी सुरू होणार याची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत होते. अशात आता 'बिग बॉस सीझन २०' चे मोठे अपडेट समोर आले आहेत. सलमान भाईचा 'बिग बॉस सीझन २०' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नवीन सीझनसाठी निर्मात्यांनी तयारीही सुरू केली आहे. भाईजानला होस्टिंग करताना पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत.

'व्हरायटी इंडिया'च्या वृत्तानुसार, सलमान २१ सप्टेंबर रोजी 'बिग बॉस २०'चे शूटिंग सुरू करेल. कार्यक्रमाचे निर्माते सध्या आगामी सीझनसाठी स्पर्धकांची निवड आणि ऑडिशनची प्रक्रिया करत आहेत. तसेच, प्रॉडक्शन हाऊस आणि वाहिनी विविध लोकप्रिय टेलिव्हिजन सेलिब्रिटींशी चर्चा करत असल्याचेही या वृत्तात म्हटले आहे. बिग बॉसची टीम इतर लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शोमधील स्पर्धकांचाही विचार करत आहे. या अहवालानुसार, काही जुने स्पर्धकही २० व्या सीझनचा भाग असू शकतात. कार्यक्रमाचे स्वरूप आणि स्पर्धकांची यादी याबद्दलची अधिक माहिती लवकरच जाहीर होण्याची अपेक्षा आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान खानची टीम 'बिग बॉस २०'साठी भाईजानचे वेळापत्रक जुळवण्याचे काम करत आहे. सलमान खान सध्या त्याच्या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे. सलमान खान वामशी पैदिपल्ली यांच्या आगामी ॲक्शन चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करण्याच्या तयारीत आहे. १५ ऑगस्ट २०२६ ला सलमान खानचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'मातृभूमि' रिलीज होणार आहे.

'बिग बॉस १९' चे विजेते

'बिग बॉस १९' चा विजेता टिव्हीचा प्रसिद्ध अभिनेता गौरव खन्ना ठरला. तर पहिली रनर-अप फरहाना भट्ट झाली. आता 'बिग बॉस सीझन २०' मध्ये कोण कोण झळकणार आणि यंदा 'बिग बॉस' ची थीम काय असणार, याची चर्चा रंगली आहे.

Bigg Boss 20 Salman Khan Show
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीला पतीकडून मारहाण, प्रकरण कोर्टात पोहोचले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com