सलमान खानचं इंस्टाग्राम अकाउंट काही काळासाठी Inactive
भाईजानच्या चाहत्यांमध्ये गोंधळ उडाला
सलमान खान पुन्हा इंस्टाग्रामवर सक्रिय
बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय पाहायला मिळतो. अशात नुकतेच सलमान खानचे इन्स्टाग्राम प्रोफाइल अचानक 'इनअॅक्सेसिबल' (पाहता न येण्यासारखे) झाल्यामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाल्या. जे यूजर्स सलमान खानचे इन्स्टाग्राम प्रोफाइल पाहण्याचा प्रयत्न करत होते, त्यांना "क्षमस्व, हे पृष्ठ उपलब्ध नाही" (Sorry, this page isn’t available) असा मेसेज दिसत होता. अभिनेत्याचे प्रोफाइल अचानक दिसत नसल्यामुळे, हे अकाउंट तात्पुरते 'डीअॅक्टिव्हेट' (निष्क्रिय) करण्यात आले आहे की अन्य काही कारणामुळे काढून टाकण्यात आले आहे, या संभ्रमात चाहते पडले.
मीडिया रिपोर्टनुसार, तब्बल ३० मिनिटांनी सलमान खानचे इन्स्टाग्राम प्रोफाइल पुन्हा दिसू लागले. सलमान खान पुन्हा चाहत्यांच्या कनेक्शमध्ये आला. अद्याप सलमान खान किंवा त्याच्या टीमने, हे अकाउंट काही काळासाठी का इनअॅक्सेसिबल झाले होते, याबद्दल कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण दिलेले नाही. हे अकाउंट इनअॅक्सेसिबल होण्यामागे तांत्रिक बिघाड, तात्पुरते निष्क्रियीकरण (deactivation) की हॅकिंगचा संभाव्य प्रयत्न, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
सलमान खानचे इन्स्टाग्राम तब्बल 72 मिलियन फॉलोअर्स आहेत. सलमान खानचे इन्स्टाग्राम प्रोफाइल अचानक 'इनअॅक्सेसिबल' झाल्याचा संबंध चाहत्यांनी रुग्णालयाच्या भेटीदरम्यान 'पॅपाराझीं'च्या गैरवर्तनाशी केला आहे. सलमानचे ट्विटर आणि फेसबुक अकाउंट सक्रिय आहेत.
सलमान खानचा 'मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस' चित्रपट १४ ऑगस्टला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. सलमान खान सध्या तेलुगू चित्रपट दिग्दर्शक वामशी पेडिपल्ली यांच्यासोबत चित्रपटाचे चित्रीकरण करत आहेत. नुकताच सलमान खान रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटात दिसला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.