Manasvi Choudhary
पावसाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. यासाठी नियमितच्या आहारपद्धतीत बदल करणे महत्वाचे आहे.
अनेकजण पावसाळ्यात जेवणासोबत दहीचे सेवन करतात. मात्र पावसाळ्यात दही खावा की नाही? दही खाल्ल्याने सर्दी- खोकला होऊ शकतो का? याविषयी या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
आयुर्वेदानुसार दही खाणे आरोग्यासाठी निरोगी मानले जाते. मात्र पावसाळ्यात दहीचे सेवन करताना योग्य वेळ आणि खाण्याची पद्धत योग्य असणे महत्वाचे आहे.
दही आरोग्यासाठी थंड असते. दही खाल्ल्याने शरीराला थंडावा मिळतो. मात्र पावसाळ्यातील थंड वातावरणामुळे दहीचे सेवन शरीरात सर्दी - खोकल्याचा त्रास वाढवू शकतात.
दही पचायला जड असते. पावसाळ्यात शरीराची पचनक्रिया मंदावलेली असते त्यात तुम्ही दहीचे सेवन केले तर आरोग्यावर परिणाम होतो. शरीरात आम्लपित्त तयार होऊ शकते.
पावसाळ्यात रात्री दही खाणे टाळा. रात्री दही खाल्ल्याने कफ आणि सर्दी होण्याची शक्यता अधिक असते. यामुळे डोकेदुखी देखील उद्भवते.
पावसाळ्यात फ्रिजमधील थंड दही खाणे टाळा. यामुळे घशाला त्रास होऊ शकतो. यामुळे आरोग्याची काळजी घ्या.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.